IND vs WI 5th T20I, Weather Report Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

IND vs WI 5th T20I, Weather Report: हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार, बंगळुरुमध्ये सामन्याच्या दिवशी 85 टक्के पावसाची शक्यता आहे, तर आकाश 99 टक्के ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. येथील तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

Manish Jadhav

IND vs WI 5th T20I, Weather Report: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि फायनल टी-20 सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका अतिशय रोमांचक आणि चुरशीची ठरली असून, सध्या मालिका 2-2 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे जो संघ हा शेवटचा सामना जिंकेल, तोच संघ मालिकेवर आपले नाव कोरले. मात्र, या निर्णायक सामन्यावर पावसाचे ढग दाटले असून सामना रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार, बंगळुरुमध्ये (Bengaluru) सामन्याच्या दिवशी 85 टक्के पावसाची शक्यता आहे, तर आकाश 99 टक्के ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. येथील तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. जरी पावसाचा व्यत्यय आला तरी चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज सिस्टीम अत्यंत आधुनिक असल्याने पाऊस थांबल्यानंतर मैदान लवकर पूर्ववत तयार केले जाऊ शकते.

एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी पर्वणी मानली जाते. या मालिकेतील मागील सामने पाहता, या फायनल सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. लहान आकाराचे मैदान आणि चेंडू बॅटवर उत्तम रित्या येत असल्याने षटकारांचा पाऊस पडू शकतो. सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, परंतु मधल्या षटकांत फिरकीपटूंना ड्यूय फॅक्टरमुळे चेंडूवर पकड ठेवणे कठीण जाईल.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय या मैदानावर फायद्याचा ठरु शकतो. बंगळुरुच्या या मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 8 टी-20 सामने खेळले असून, 4 सामन्यांत विजय तर 3 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे वेस्ट इंडिजचा संघही विजयासाठी पूर्ण जोर लावेल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

SCROLL FOR NEXT