IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

IND VS WI T20I Series Schedule: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका संपली असून, टीम इंडियाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली आहे.
IND VS WI T20I Series Schedule
IND VS WI T20I Series ScheduleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका संपली असून, टीम इंडियाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली आहे. आता दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेला ६ ऑक्टोबर २०२६पासून सुरुवात होणार असून, मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात

या टी-२० मालिकेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय टी-२० संघाकडून आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजयानंतर आता कॅरेबियन संघाविरुद्ध भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

IND VS WI T20I Series Schedule
Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता

भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील पाचही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. सामन्यापूर्वी अर्धा तास म्हणजेच सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.

मालिकेतील सामने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार असल्याने चाहत्यांना आपल्या जवळच्या मैदानावर सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.

पहिला सामना लखनऊमध्ये

मालिकेतील पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा सामना ९ ऑक्टोबरला रांचीमध्ये होणार आहे. तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ ११ ऑक्टोबरला इंदूरमध्ये आमनेसामने येतील.

यानंतर चौथा सामना १४ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये, तर मालिकेतील अखेरचा आणि पाचवा टी-२० सामना १७ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.

IND VS WI T20I Series Schedule
Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

वनडे मालिकेत भारताची बाजी

टी-२० मालिकेपूर्वी भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारताने वेस्ट इंडिजचा प्रत्येकी ८ विकेट्सने पराभव केला. तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी येथे भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.

मात्र, तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन करत भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. तरीही सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यामुळे भारताने मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली. या मालिकेत शुभमन गिलने सर्वाधिक धावा करत प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्कार पटकावला.

IND VS WI T20I Series Schedule
IND VS WI T20I Series ScheduleDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com