Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: पहिल्या T20 मधूनच झाले स्पष्ट, 'या' खेळाडूला बेंचवर बसून पाहावी लागणार मालिका!

Team India: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून हे स्पष्ट झाले की, आता कर्णधार हार्दिक पांड्या संपूर्ण T20 मालिकेसाठी एका खेळाडूला संधी देऊ शकणार नाही.

दैनिक गोमन्तक

India vs Sri Lanka, 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून हे स्पष्ट झाले की, आता कर्णधार हार्दिक पांड्या संपूर्ण T20 मालिकेसाठी एका खेळाडूला संधी देऊ शकणार नाही.

पहिल्या T20 मधूनच हे स्पष्ट झाले

टीम इंडियाचा (Team India) T20 कर्णधार हार्दिक पांड्याला कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही. प्रत्येक सामन्यासाठी त्याला सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची निवड करायची आहे. आपल्या नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या अशा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ इच्छितो, ज्यांच्याकडे भारतासाठी एकहाती सामना जिंकण्याची ताकद आहे. हार्दिकचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलवर खूप विश्वास आहे, तो आता या संपूर्ण T20 मालिकेत ऑफ-स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला संधी देईल.

या खेळाडूला मिळणार नाही संधी!

श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) पहिल्या T20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने अक्षर पटेलला अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या सामन्यात 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना अक्षरने 31 धावांची उपयुक्त खेळी केली, ज्याच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले.

बेंचवर बसून संपूर्ण मालिका पाहावी लागणार आहे

पहिल्या T20 सामन्यात श्रीलंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पांड्याने शेवटचे षटक स्वतःहून अक्षर पटेलकडे सोपवले आणि अक्षर पटेलने शेवटचे षटक टाकले. अक्षरने भारताला 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. आता या टी-20 मालिकेतील आगामी 2 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधार हार्दिक पांड्या अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देईल. दुसरीकडे मात्र, वॉशिंग्टन सुंदरला संपूर्ण मालिका बेंचवर बसून पाहावी लागेल.

भारताचा श्रीलंकेविरुद्धचा T20 संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल. , यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार, शिवम मावी.

भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सामने:

  • भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिका

  • दुसरा T20 सामना, 5 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, पुणे

  • तिसरा T20 सामना, 7 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, राजकोट

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका

  • पहिला एकदिवसीय, 10 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, गुवाहाटी

  • दुसरी वनडे, 12 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, कोलकाता

  • तिसरा एकदिवसीय, 15 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, तिरुअनंतपुरम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: मंत्री रवी नाईक यांना कोडारवासियांचे IIT विरोधात निवेदन

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT