Ind vs SL: टीम इंडियाला मिळाला बुमराहपेक्षा घातक गोलंदाज, कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात...

Ind vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे.
Shivam Mavi
Shivam MaviDainik Gomantak

Ind vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात कर्णधार हार्दिकने शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज शिवम मावीला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली. दोन्ही खेळाडूंचा हा पहिलाच टी-20 सामना आहे. गिलला पहिल्याच सामन्यात विशेष काही करता आले नाही. 5 चेंडूत 7 धावा करुन तो बाद झाला.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाज शिवम मावीबद्दल (Shivam Mavi) बोलायचे झाल्यास, त्याने चमकदार कामगिरी केली. आपल्या कारकिर्दीची चांगली सुरुवात करत त्याने पहिल्याच षटकात एक विकेट घेतली. श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर आणि पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर मावीने सलामीवीर पथुम निसांकाला बाद केले. यानंतरही शिवम मावीची धोकादायक गोलंदाजी सुरुच होती. त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर धनंजय डिसिल्व्हाला बाद करुन आपली दुसरी विकेट घेतली.

Shivam Mavi
IND vs SL: बुमराह इज बॅक! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल

दरम्यान, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या शिवम मावीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मावी अंडर-19 संघाचा भाग राहिला आहे. यापूर्वी, शिवम मावीला 23 डिसेंबर रोजी झालेल्या IPL मिनी लिलावात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने खरेदी केले होते. त्यावेळी, शिवम मावीची बेस प्राइज 40 लाख रुपये होती आणि फ्रँचायझीने त्याला 6 कोटी रुपयांत खरेदी केले होते.

तसेच, शिवम मावीने 2018 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून 32 सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 30 विकेट्स आहेत. शिवम मावीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 21 धावांत 4 बळी. मावीने 2021 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. 2018 मध्ये शिवम अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून (Uttar Pradesh) खेळतो.

Shivam Mavi
IND vs SL: 'आमची बॉडी लँग्वेजच पुरेशी...', कॅप्टन हार्दिकने श्रीलंकेला भरला दम

टीम इंडियाने श्रीलंकेला 163 धावांचे लक्ष्य दिले

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या 38 चेंडूत 68 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून 162 धावा केल्या. श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर भारतीय संघ 94 धावांत पाच गडी गमावून अडचणीत सापडला होता, मात्र हुड्डाने 23 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 41 धावा केल्या तर अक्षरने 20 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद 41 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com