IND vs SL: 'कदाचीत पराभूत झालो असतो, पण...' हार्दिककडून अक्षरला 20वी ओव्हर देण्याचे कारण स्पष्ट

अक्षर पटेलला शेवटच्या षटकात गोलंदाजी देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारी टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने केवळ 2 धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला गोलंदाजी देण्याची जोखीम पत्करली होती. आता या निर्णयाबद्दल हार्दिकनेच खुलासा केला आहे.

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला 163 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत हार्दिकने त्याच्या गोलंदाजी कोटामधील षटके बाकी असतानाही अक्षरकडे चेंडू सोपवला.

Team India
IND vs SL: बुमराह इज बॅक! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल

अक्षरने पहिल्या तीन चेंडूतच 8 धावा दिल्या. त्यामुळे भारतासमोर पराभवाचे संकट उभे राहिले होते. मात्र, त्यानंतर अक्षरने संयम राखत अखेरच्या तीन चेंडूत 2 धावाच दिल्या. तसेच दोन श्रीलंकन खेळाडू धावबादही झाले. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला. दरम्यान, हार्दिक सामना सुरू असताना क्रँप आल्याने मैदानातून बाहेर गेला होता. पण, तो नंतर पुन्हा थोडावेळात मैदानात परतला.

सामन्यानंतर या सर्व गोष्टींवर हार्दिकने भाष्य केले. तो अक्षरला अखेरच्या षटकात गोलंदाजी देण्याबद्दल म्हणाला, 'कदाचीत आम्ही सामना पराभूत झालो असतो, पण हे ठिक आहे. मला या संघाला अशा कठीण परिस्थितीत टाकायचे आहेत. कारण यामुळे मोठ्या सामन्यांसाठी आम्हाला मदत होईल.'

'द्विपक्षीय मालिकांमध्ये आम्ही योग्य आहोत, पण अशाप्रकारे आम्ही स्वत:ला आव्हान देऊ शकतो. खरं सांगायचे तर सर्व युवा खेळाडूंनी आम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.'

Team India
IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत BCCI ने अचानक बदलली ट्रॉफी, नवा लूक पाहून...

भारताकडून सुरुवातीला शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी चांगली सुरुवात केली होती. या सामन्यात पदार्पणवीर मावीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच उमरानने 2 विकेट्स घेतल्या.

हार्दिकने त्याच्या दुखापतीबद्दल सांगितले की 'ते फक्त क्रँप होते. आता माझ्याकडे लोकांना घाबरवण्याची प्रवृत्तीच आहे, पण मी जेव्हा हसत असतो, तेव्हा सर्वकाही ठीक आहे असे समजा. मी नीट झोपू शकलो नव्हतो आणि पाणीही कमी पिले होते. त्यामुळे असे झाले.'

दरम्यान भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या होत्या. भारताकडून दीपक हुडाने नाबाद 41 धावा केल्या, तर अक्षर पटेलने नाबाद 31 धावा केल्या. या दोघांनी 6 व्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 68 धावांच्या भागीदारीमुळे भारताला 160 धावांचा टप्पा ओलांडता आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com