India vs Sri Lanka, 2nd T20I Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL, 2nd T20I: टीम इंडियातून 3 खेळाडूंचा पत्ता कट? अशी असू शकते 'प्लेइंग इलेव्हन'

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज दुसरा टी20 सामना होणार आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 2nd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो भारतीय संघासह पुण्यालाही आला नसल्याचे समजले आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टी20 सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर पुण्यातीलच राहुल त्रिपाठीला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळू शकते.

याशिवाय युजवेंद्र चहल यालाही दुसऱ्या टी20 सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. चहलची पहिल्या टी20 सामन्यातही फारशी प्रभावी कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. सुंदर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्याच्या जोडीला संघात अक्षर पटेल असेल.

तसेच जर अर्शदीप सिंग बरा झाला असेल, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते. त्याला हर्षल पटेलच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते.

त्याचबरोबर सलामीसाठी ईशान किशन आणि शुभमन गिल कायम राहू शकतात. तसेच मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याही खेळतील. तर अष्टपैलू दीपक हुडा देखील आपली जागा कायम ठेवण्याची शक्यता आहे. गोलंदाजी फळीत उमरान मलिक आणि शिवम मावीही संघात कायम असू शकतात.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताचा संभावित 11 जणांचा संघ -

ईशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग/हर्षल पटेल.

विजयी आघाडीची भारताला संधी

पुण्यात होणारा हा टी20 सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने पहिला सामना 2 धावांनी जिंकला होता आणि 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे दुसरा टी20 सामाना जिंकला, तर भारतीय संघ ही मालिका खिशात घालेल.

पण, पहिल्या सामन्याप्रमाणेच श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यातही तगडी लढत देऊन विजय मिळवला, तर ते मालिकेत बरोबरी करतील. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT