India vs Pakistan: येत्या दोन वर्षात भारत-पाकिस्तान सामन्यांची पर्वणी! जय शाह यांची मोठी घोषणा

जय शाह यांनी पुढील दोन वर्षांतील आशिया स्पर्धांचे वेळापत्रक घोषित केले आहे.
India vs Pakistan Cricket match
India vs Pakistan Cricket matchDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा जगभरातील चाहत्यांचे लक्ष या लढतीकडे असते. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांचा आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी एकाच गटात समावेश आहे.

नुकतेच एशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जय शाह यांनी गुरुवारी आशियामधील 2023-2024 मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. या वेळापत्रकातून स्पष्ट होत आहे की भारत आणि पाकिस्तान सप्टेंबर 2023 मध्ये होणाऱ्या पुरुष आशिया चषकात एकाच गटात आहेत. यावर्षीचा आशिया चषक वनडे प्रकारात खेळवला जाणार आहे.

तसेच या स्पर्धेसाठी भारत-पाकिस्तान यांच्या गटात पात्रता फेरीतून पात्र होणारा संघही असेल. तसेच दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत.

India vs Pakistan Cricket match
Team India: नववर्षाची सुरुवात व्यस्त! 3 महिन्यांत 3 संघांविरुद्ध 6 मालिका, पाहा संपूर्ण वेळापत्रक

याशिवाय 2024 मध्ये महिला टी20 आशिया चषक होणार आहे. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. त्यांच्यासह बांगलादेशचा महिला संघही गटात आहे. तर दुसऱ्या गटात श्रीलंकेसह पात्रता फेरीतून येणारे दोन संघ खेळतील. ही स्पर्धा सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे.

दरम्यान, जय शाह यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार चँलेंजर कप, प्रीमियर कप या स्पर्धा आशिया चषकासाठी पात्रता स्पर्धा असतील. तसेच येत्या दोन वर्षात 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील स्पर्धाही खेळवल्या जाणार आहेत.

त्याचबरोबर जुलै 2023 मध्ये पुरुष उदयोन्मुख वनडे आशिया चषक स्पर्धा, तर डिसेंबर 2024 मध्ये पुरुष उदयोन्मुख टी20 आशिया चषक स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धांमध्ये भारताचा अ संघ सहभागी होईल. त्याचबरोबर या स्पर्धांमध्येही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.

इतकेच नाही, तर डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील आशिया चषकातही भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धांमध्ये येत्या दोन वर्षात क्रिकेट चाहत्यांना अनेक भारत विरुद्ध पाकिस्तान सामने पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सप्टेंबर 2023 मध्ये होणारा आशिया चषक कुठे आयोजित केला जाणार आहे, याबद्दल अद्याप संभ्रम आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे अधिकृत यजमान आहेत. मात्र, भारताने पाकिस्तानामध्ये खेळण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानमधून दुसऱ्या ठिकाणी हलवली जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com