India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सध्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. मात्र, त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी20 मालिकेतून बाहेर गेला आहे.
सॅमसनला पर्यायी खेळाडू म्हणून जितेश शर्मा भारतीय संघात सामील झाला आहे. सॅमसन दुसऱ्या टी20 सामन्यासाठी पुण्यालाही गेलेला नाही. त्यामुळे जितेशला संधी देण्यात आलेली आहे.
(Jitesh Sharma joins Team India as cover for Sanju Samson)
जितेशचा जन्म महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झाला. त्याचे कुटुंब मुळचे हिमाचल प्रदेशचे आहे, पण ते अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे जितेश देशांतर्गत क्रिकेट विदर्भाकडून खेळतो. त्याने विदर्भासाठी चांगली कामगिरी केली आहे.
मात्र, काही काळापूर्वी त्याला मानसिक तणावामुळे काहीदिवस विदर्भ संघातून दूर रहावे लागले होते. पण नंतर त्याने पुनरागमन केले. त्याने यापूर्वी आयपीएलमध्येही सामने खेळले आहेत. त्याने गेल्यावर्षी पंजाब किंग्सकडून खेळताना 12 सामन्यांत 163.64 च्या स्ट्राईकरेटने 234 धावा केल्या होत्या. त्याला या हंगामसाठी पंजाबने 20 लाखांमध्ये खरेदी केले होते.
जितेश यापूर्वी मुंबई इंडियन्सचाही भाग होता. 2016 साली त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. मात्र त्याला त्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
तो नुकताच विदर्भाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळला होता. जितेशने आत्तापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 553 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 47 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1350 धावा केल्या आहेत. याशिवाय तो 76 टी20 सामने खेळला असून 1 शतक आणि 9 अर्धशतकांसह 1787 धावा केल्या आहेत.
जर जितेशला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली, तर तो भारताकडून खेळणारा विदर्भाचा तिसराच खेळाडू ठरेल. याआधी केवळ उमेश यादव आणि फेज फेजल या विदर्भाच्या खेळाडूंनी भारताकडून सामने खेळले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.