Team India Dainik Gomantak
क्रीडा

India Vs South Africa: टीम इंडिया पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जाणार, टेस्ट-वनडे आणि टी-20 मालिकेचं शेड्यूल जाहीर

Team India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासमोर खरे आव्हान वर्षाच्या अखेरीस येईल, जेव्हा त्यांना दक्षिण आफ्रिकेचा दौरा करावा लागेल.

Manish Jadhav

India Vs South Africa: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु झाला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात असून टीम इंडिया मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.

टीम इंडिया ही कसोटी आणि मालिका जिंकेल, याबद्दल कोणालाही शंका नाही. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासमोर खरे आव्हान वर्षाच्या अखेरीस येईल, जेव्हा त्यांना दक्षिण आफ्रिकेचा दौरा करावा लागेल.

वेस्ट इंडिजनंतर टीम इंडियाची पुढील मालिका डिसेंबरमध्ये सुरु होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दुसरीकडे, दीड वर्षापूर्वीही टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, जिथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. यामध्ये भारतीय संघाला दोन्ही मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

कसोटी मालिकेसह कोहलीचे कर्णधारपदही संपुष्टात आले होते. तर एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले होते.

एका महिन्यात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका

आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया डिसेंबरच्या अखेरीस दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी, 14 जुलै रोजी या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.

भारतीय संघ सुमारे महिनाभर दक्षिण आफ्रिकेत असेल, जिथे टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली जाईल. त्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेने होणार आहे. T20 मालिका आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी तीन सामने खेळवले जातील.

टी-20 नंतर 17 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका सुरु होईल, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून म्हणजेच बॉक्सिंग डेपासून सुरु होईल.

मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पाहा संपूर्ण शेड्यूल

T20 मालिका

पहिला T20 सामना: रविवार, 10 डिसेंबर - हॉलीवूडबेट्स किंग्समीड स्टेडियम, डर्बन

दुसरा T20 सामना: मंगळवार, 12 डिसेंबर – सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा

तिसरा T20 सामना: गुरुवार, 14 डिसेंबर - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

वनेड मालिका

पहिली वनडे: रविवार, 17 डिसेंबर - बेटवे पिंक डे - डीपी वर्ल्ड वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

दुसरी वनडे: मंगळवार, 19 डिसेंबर – सेंट जॉर्ज पार्क, गेबरहा

तिसरी वनडे: गुरुवार, 21 डिसेंबर – बोलंड पार्क, पार्ल

कसोटी मालिका

पहिली कसोटी: 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन

दुसरी कसोटी: 3 जानेवारी – 7 जानेवारी – न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केपटाऊन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT