India Women Cricket Team: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, स्टार खेळाडूंना वगळले

Team India: बीसीसीआयने जुलैमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
India Women Cricket Team
India Women Cricket TeamDainik Gomantak

India ODI and T20I Women squad for Bangladesh Tour: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाचा बांगलादेश दौरा ९ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

या दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात स्टार खेळाडू शिखा पांडे, रेणूका सिंग, ऋचा घोष यांची नावे वगळण्यात आली आहेत. तसेच राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड या फिरकीपटूंची नावेही संघात दिसत नाहीत. पण या खेळाडूंना वगळण्यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही.

दरम्यान, अनुभवी खेळाडूंची नावे संघात दिसत नसली तरी उमा छेत्री, राशी कनोजिया, अनुशा बारेड्डी आणि मिनू मणी असे काही नव्या चेहेऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

India Women Cricket Team
Team India: "किमान एशियन गेम्ससाठी तरी 'त्याला' कॅप्टन करा", दिग्गज भारतीय विकेटकिपरची मागणी

असा होणार बांगलादेश दौरा

या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेने होणार आहे. टी20 मालिकेत 9,11 आणि 13 जुलै रोजी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा सामना होईल.

त्यानंतर 16 जुलैला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. यानंतर 19 आणि 22 जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना होईल. टी20 आणि वनडे मालिकेतील सर्व सामने मीरपूरमधील शेर-ए-बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियवर होणार आहेत.

  • असा आहे भारताचा टी20 महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, मिनू मणी.

  • असा आहे भारताचा वनडे महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, अंजली सरवानी, मोनिका पटेल, राशी कनोजिया, अनुषा बरेड्डी, स्नेह राणा.

भारतीय महिला संघाच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक -

टी20 मालिका (बांगलादेश महिला विरुद्ध भारतीय महिला)

  • 9 जुलै - पहिला टी20 सामना, मीरपूर

  • 11 जुलै - दुसरा टी20 सामना, मीरपूर

  • 13 जुलै - तिसरा टी20 सामना, मीरपूर

वनडे मालिका (बांगलादेश महिला विरुद्ध भारतीय महिला)

  • 16 जुलै - पहिला वनडे सामना, मीरपूर

  • 19 जुलै - दुसरा वनडे सामना, मीरपूर

  • 22 जुलै - तिसरा वनडे सामना, मीरपूर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com