Team India Video: टीम इंडियाचा मनाचा मोठेपणा! वेस्ट इंडिजमधील स्थानिक खेळाडूंना सिराजकडूनही स्पेशल गिफ्ट

Video Viral: भारतीय संघाने बार्बाडोसमधील स्थानिक खेळाडूंचा दिवस स्पेशल बनवला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Mohammed Siraj presented bat and pair of shoes to local player in Barbados: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी, 3 सामन्यांची वनडे आणि 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. 12 जुलैपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेपूर्वी भारतीय संघ सध्या बार्बाडोस येथे कसून तयारी करत आहे.

भारतीय संघाने यादरम्यान बार्बाडोसमधील स्थानिक खेळाडू आणि चाहत्यांचा दिवस आनंदी बनवला आहे. याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

Team India
BCCI Chief Selector: शिक्कामोर्तब झालं! अजित आगरकर भारतीय संघाचा नवा 'चीफ सिलेक्टर'

या व्हिडिओमध्ये दिसते रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, विराट कोहली, आर अश्विन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, अजिंक्य रहाणे अशा भारतीय संघातील खेळाडूंनी स्थानिक खेळाडूंबरोबर काही वेळ घालवला. त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांना मार्गदर्शनही केले.

याशिवाय मोहम्मद सिराज एका स्थानिक खेळाडूला स्वाक्षरी केलेली बॅट आणि शुज देतानाही दिसला. त्याचबरोबर सिराजने या व्हिडिओमध्ये सांगितले की या स्थानिक खेळाडूंना त्याला सर्वादरम्यान खूप मदत केली. या व्हिडिओच्या शेवटी भारतीय खेळाडू चाहत्यांबरोबरही संवाद साधताना आणि त्यांना स्वाक्षरी देताना दिसले.

भारतीय संघात नवे चेहेरे

दरम्यान, भारतीय कसोटी संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

मात्र, या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव अशा अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.

अशा होणार मालिका

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.

Team India
Yashasvi Jaiswal - Virat Kohli: जयस्वालसाठी विराटची कोचिंग! बॅटिंग टिप्स देतानाचा व्हिडिओ व्हायरल

असे आहे भारतीय संघाचे वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

  • कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका

    20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद

  • वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस

    1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

  • टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

    3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद

    6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना

    12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

    13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com