Gautam Gambhir Reaction Pakistan Boycott T20 World Cup 2026 Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Boycott: एअरपोर्टवर पाकिस्तानचा प्रश्न अन् गौतम गंभीरची 'रिॲक्शन', व्हिडिओ होतोय व्हायरल

Gautam Gambhir Reaction Pakistan Boycott T20 World Cup 2026: येत्या १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सामन्यापूर्वी क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

येत्या १५ फेब्रुवारीला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सामन्यापूर्वी क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा अनपेक्षित निर्णय घेतल्याने क्रीडा वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या प्रकरणावर चपखलपणे मौन पाळणे पसंत केले आहे. सोशल मीडियावर गंभीरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यात त्यांनी पाकिस्तानशी संबंधित प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

गंभीरची पहिली प्रतिक्रिया

नुकताच गौतम गंभीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते मुंबईला रवाना होण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले आणि पाकिस्तानच्या बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया विचारली.

एकेकाळी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत आक्रमक भूमिका मांडणारे गंभीर आता मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीत आहेत. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, गंभीर यांनी या प्रश्नावर एक शब्दही न बोलता थेट पुढे जाणे पसंत केले. ही त्यांची रणनीती आहे की संयम, यावर आता चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

वादाला पूर्णविराम

जरी गंभीर यांनी पाकिस्तानच्या प्रश्नाला बगल दिली असली, तरी त्यांनी चाहत्यांच्या प्रेमाचा आदर राखला. भारतीय संघाला आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे त्यांनी आभार मानले. "धन्यवाद" म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांचा निरोप घेतला. भारतीय संघाने २०२४ मध्ये विश्वचषक जिंकला असून, सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे मोठे आव्हान गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियासमोर आहे. या महत्त्वाच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच त्यांनी मैदानाबाहेरील राजकारणावर बोलणे टाळल्याचे बोलले जात आहे.

टीम इंडियाची फिटनेस टेस्ट

एकीकडे पाकिस्तानचा वाद रंगला असताना, दुसरीकडे भारतीय संघ आपल्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीवरून चिंतेत आहे. अक्षर पटेल आणि टिळक वर्मा यांच्या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापनाची धाकधूक वाढली होती. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे टिळक वर्मा आता पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून अक्षर पटेलनेही संघात पुनरागमन केले आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याच्या फिटनेसवर मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. लवकरच त्याच्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT