Sameer Panditrao
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोवा का आहे कपल्सची पहिली पसंती? वाचा.
बागा, कळंगुट, हणजूण असे किनारे आहेत तिथे तुम्हाला नाईटलाईफ, म्युझिक, वॉटर स्पोर्ट्स अशा बीच ऍक्टिव्हिटीसह व्हॅलेंटाईन डे साजरा करता येईल.
गोव्यात काही किनारे असेही आहेत जिथे फक्त तुम्हाला शांतता मिळेल.
प्रेमात थोडं अॅडव्हेंचर हवंय? दूधसागर धबधबा आणि आसपासचा जंगल परिसर तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देईल.
शापोरा, काबो द राम, अग्वादा, रेईश मागोस किल्ल्यांवर फिरणे, सनसेटवेळी फोटो काढणे यात खूप चांगल्या आठवणी तयार होतील.
मांडवी नदीवरील क्रूझवर डिनर, म्युझिक, डान्ससह तुम्हाला मस्त वेळ घालवता येईल.
गोव्याच्या निसर्गाच्या कुशीत शांत वेळ घालवण्यासाठी तिथला ग्रामीण भाग, जंगल परिसर नक्की भटका आणि आरामात वेळ घालवा.