Goa Crime: बाणावलीत भरदिवसा राडा! किरकोळ वादातून तुफान हाणामारी, काचेच्या बाटल्यांनी हल्ला; कर्नाटक, सिक्कीममधील दोघे अटकेत

Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach: गोव्यातील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach
Colva Police Arrest Two for Assault at Benaulim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

कोलवा: गोव्यातील दक्षिण भागात असलेल्या प्रसिद्ध बाणावली बीच रोडवर किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत कर्नाटक आणि सिक्कीममधील दोन तरुणांना अटक केली आहे. संशयितांनी फिर्यादीवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाणावली बीचकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. कर्नाटकचा रहिवासी शिवा कामदळी आणि सिक्कीमचा रहिवासी दिज्जन कुमार सिंग या दोघांचा फिर्यादीसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयितांनी रागाच्या भरात रस्त्या कडेला पडलेल्या काचेच्या बाटल्या उचलल्या आणि फिर्यादीवर हल्ला चढवला. या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादीच्या छातीवर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach
Goa BJP: भाजपने कंबर कसली, विरोधी पक्षांचे अजून ठरेना; गोवा विधानसभा निवडणूकीचे बिगुल

कोलवा पोलिसांकडून कारवाई

घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी जबाब नोंदवून घेत शिवा कामदळी आणि दिज्जन कुमार सिंग या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

Colva Police Arrest Two for Assault at Benaulim Beach
Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ असते, मात्र अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेषतः मद्यधुंद अवस्थेत होणारे वाद आणि त्यातून होणारे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com