Rohit Sharma and Shubman Gill
Rohit Sharma and Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: जोडी नंबर वन! गिल-रोहितने शतकं ठोकत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, सेहवाग-गंभीरलाही टाकलं मागे

Pranali Kodre

India vs New Zealand, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी खेळला गेला. इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार खेळ करत वैयक्तिक अर्धशतके झळकावली. याबरोबरच त्यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या निमंत्रणाचा स्विकार करत भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि युवा क्रिकेटपटू शुभमन गिल सलामीला फलंदाजीला उतरले.

या दोघांनीही द्विशतकी भागीदारी रचत 26 व्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करायला लावला. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. रोहितने 83 चेंडूत त्याचे 30 वे शतक पूर्ण केले. रोहितने तब्बल ३ वर्षांनंतर वनडेमध्ये शतक झळकावले आहे.

त्याचे शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच शुभमन गिलने 72 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. शुभमनचे हे गेल्या 4 सामन्यातील तिसरे शतक आहे. विशेष म्हणजे रोहित आणि शुभमन या दोघांही या सामन्याच्या 26 व्या षटकात शतके पूर्ण केली.

भागीदारीत रचला इतिहास

दरम्यान, रोहित आणि शुभमन यांची भागीदारी चांगली रंगली असतानाच 27 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहितला मायकल ब्रेसवेलने त्रिफळाचीत करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 28 व्या षटकात शुभमनही ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पण या दोघांनी 212 धावांची सलामी भागीदारी रचत मोठा विक्रम केला. त्यांची जोडी आता न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करणारी सलामी जोडी ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या नावावर आहे. या दोघांनी 2009 साली हेमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामना खेळताना सलामीला नाबाद 201 धावांची भागीदारी रचली होती.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माने 85 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 78 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 112 धावांची खेळी केलीय

(Rohit Sharma - Shubman Gill Made Highest opening partnership vs New Zealand in ODIs)

न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या सलामी जोड्या -

212 धावा - रोहित शर्मा आणि शुभमन गिल, इंदोर, 2023

201* धावा - विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर, हेमिल्टन, 2009

201 धावा - सनथ जयसूर्या आणि उपूल थरंगा, नेपियर, 2006

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT