Rohit Sharma Test Captaincy: रोहित शर्माला फार काळ भारताचे कसोटी कर्णधारपद सांभाळणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय तीन युवा खेळाडूपैकी एकाची भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून निवड करु शकते.
दरम्यान, बीसीसीआय (BCCI) तीन युवा खेळाडूंना भारताचा नवा कसोटी कर्णधार बनवू शकते, जे दीर्घकाळ टीम इंडियाचे कसोटी कर्णधारपद सांभाळू शकतात. रोहित शर्मा त्याच्या कर्णधारपदाच्या काळात बहुतेक वेळा भारतीय संघाबाहेर राहिला आहे. एक नजर टाकूया त्या 3 खेळाडूंवर जे बनू शकतात टीम इंडियाचे पुढील कसोटी कर्णधार.
अलीकडेच, न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पहिल्या वनडेत द्विशतक झळकावून इतिहास रचणारा युवा फलंदाज शुभमन गिलची सर्वत्र चर्चा होत आहे. टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिलला भारताचा पुढील कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. 23 वर्षीय शुभमन गिल त्याच्या निडर फलंदाजीसाठी ओळखला जातो.
तर, रोहित शर्माची कसोटी कारकीर्द आता फारशी उरलेली नाही, अशा स्थितीत 23 वर्षीय शुभमन गिलला सलामीसोबतच भारताच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. शुभमन गिलचे कसोटी क्रिकेटमधील भवितव्य खूप उज्ज्वल आहे, अशा परिस्थितीत तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ सलामी देऊ शकतो आणि कर्णधारपदाचीही भूमिका बजावू शकतो.
श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 56.73 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.
टीम इंडियाचा प्रतिभावान मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हा भारताचा पुढील कसोटी कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. 28 वर्षीय श्रेयस अय्यरने आता भारताच्या कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. अय्यर टीम इंडियासाठी कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि या फॉरमॅटमध्ये त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. श्रेयस अय्यरला भारताचा पुढील कसोटी कर्णधार बनवल्यास संघाला त्याचा मोठा फायदा होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याला भारताचा पुढील कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा भारताचा पुढील कसोटी कर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार आहे.
25 वर्षीय ऋषभ पंत तरुण असून तो दीर्घकाळ भारताचे कर्णधारपद भूषवू शकतो. ऋषभ पंत जरी T20 आणि ODI क्रिकेटमध्ये फ्लॉप फलंदाज ठरला असला तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.