Reactions on Shubman Gill Double Century Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: 'दिल, दिल, शुभमन गिल...', डबल सेंच्यूरीनंतर Gill वर अभिनंदानाचा वर्षाव, पाहा ट्वीट्स

शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक केल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारी वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात द्विशतक करत शुभमन गिलने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

23 वर्षीय शुभमन गिलने या सामन्यात 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले. त्यामुळे तो वनडेमध्ये द्विशतक करणारा जगातील आठवा आणि भारताचा पाचवा खेळाडू ठरला. याबरोबरच तो वनडेत द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटूही ठरला.

त्याच्या या विक्रमानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या द्विशतकानंतर त्याचे अभिनंदन करण्यासाठी ट्वीट केले.

(Cricket Fraternity reactions on Shubman Gill ODI Double Hundred)

भारताकडून वनडे द्विशतक करणारा दुसरा फलंदाज असलेला विरेंद्र सेहवागने शुभमनचे कौतुक करताना लिहिले, 'वाह शुभमन, द्विशतक, शानदार.'

माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने लिहिले, 'वनडेमध्ये 200 धावा, तेही इतक्या कमी वयात. शानदार, जबरदस्त. माझ्यासाठी आणि शुभमनच्या वडिलांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. शुभमन अभिनंदन, संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.'

माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने लिहिले की 'दिल दिल शुभमन गिल.' त्याचबरोबर श्रेयस अय्यरने ट्वीट केले की 'दर्जेदान. अभिनंदन आणि मस्त खेळलास भावा.'

याशिवाय देखील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्वीट केले आहेत.

भारताचा अखेरच्या षटकात विजय

दरम्यान, भारताकडून शुभमन गिलशिवाय कोणत्याही फलंदाजाने बुधवारी झालेल्या सामन्यात 50 धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. भारताकडून शुभमननंतर सर्वाधिक 34 धावा कर्णधार रोहित शर्माने केल्या.

तसेच हार्दिक पंड्याने 31 धावांची खेळी केली. पण, गिलने केलेल्या द्विशतकामुळे भारतीय संघ धावफलकावर 50 षटकात 8 बाद 349 धावा लावू शकला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल आणि हेन्री शिपली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 350 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी 131 धावांवरच 6 विकेट्स गमावल्या होत्या. पण, नंतर मायकल ब्रेसवेल आणि मिशेल सँटेनरने सातव्या विकेटसाठी तब्बल 162 धावांची भागीदारी केली.

त्यामुळे सामन्याचे पारडेही अखेरच्या काही षटकांमध्ये न्यूझीलंडच्या बाजूने झुकले होते. पण सँटेनर 46 व्या षटकात 57 धावांवर बाद झाला. पण त्यानंतरही ब्रेसवेलने तळातील फलंदाजांना हाताशी घेत न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अखेरच्या षटकात 140 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडचा डावही 337 धावांवर संपुष्टात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT