India vs New Zealand: रोहितच टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! रेकॉर्ड्स पाहून बसेल विश्वास

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

India vs New Zealand ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादला खेळवण्यात आला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रोहितबरोबर शुभमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरला. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करून दिली.

Rohit Sharma
India vs New Zealand: वनडेमध्ये कोणाचं वर्चस्व? एका क्लिकवर जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. पण तो चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही आणि 38 चेंडूत 34 धावा करून 13 व्या षटकात ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, त्याने या छोटेखानी खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्यामुळे रोहित आता वनडे क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. रोहितच्या नावावर आता भारतात खेळताना वनडेत 125 षटकारांची नोंद झाली आहे. धोनीने भारतात खेळताना वनडेमध्ये 123 षटकार मारले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू

125 षटकार - रोहित शर्मा (75 सामने)

123 षटकार - एमएस धोनी (130 सामने)

71 षटकार - सचिन तेंडुलकर (164 सामने)

66 षटकार - विराट कोहली (105 सामने)

65 षटकार - युवराज सिंग (111 सामने)

(Rohit Sharma hits most ODI sixes in India)

Rohit Sharma
Rohit Sharma: अन् हिटमॅनला पाहून छोट्या चाहत्याला कोसळले रडू, मग काय झाले पाहा Video

रोहित वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू

रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडूही आहे. त्याने आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 239 सामन्यांमध्ये 265 षटकार मारले आहेत. या यादीत त्याच्या पाठोपाठ 229 षटकारांसह एमएस धोनी आहे.

त्याचबरोबर रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करणाराही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 511 षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मारले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 पेक्षा अधिक षटकार मारलेत. त्याने 553 षटकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com