Mitchell Santner and Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 1st T20I: किंवीना आस्मान दाखवण्यासाठी पंड्या ब्रिगेड सज्ज, पाहा Playing XI

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रांचीमध्ये पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ ही मालिका रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह अशा प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी काही युवा खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तसेच भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे.

दरम्यान, पृथ्वी शॉ, युजवेंद्र चहल, जितेश शर्मा आणि मुकेश कुमार यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

त्याचबरोबर केन विलियम्सन आणि टीम साऊदीही या मालिकेचा भाग नसल्याने न्यूझीलंडचे टी२० मालिकेसाठी कर्णधारपद मिशेल सँटेनरकडे आहे. तसेच टॉम लॅथम आणि हेन्री निकोल्स हे देखील भारताविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर परत मायदेशी गेले आहेत. त्यामुळे त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये ईश सोधी आणि मार्क चॅपमनला संधी दिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघात आत्तापर्यंत 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 12 सामने भारताने जिंकले आहेत, तसेच 9 सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे. तसेच एक सामना बरोबरीत सुटला आहे.

त्याचबरोबर भारतात झालेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आत्तापर्यंत या दोन संघात खेळवण्यात आले आहेत. यातील 5 सामने भारताने जिंकले आहेत, तर 3 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या टी20 मालिकेपूर्वी या दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे मालिका झाली आहे. या मालिकेत भारताने 3-0 अशा फरकाने जिंकली होती. त्यामुळे टी20 मालिकेत भारतीय संघ आत्मविश्वासाने उतरेल, तर वनडे मालिकेतील कामगिरी विसरून टी20 मालिकेत यश मिळवण्याचा मानस न्यूझीलंडचा असणार आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ -

भारतीय संघ - ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

न्यूझीलंड संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकॉब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT