India vs New Zealand 3rd ODI: टीम इंडियाने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत किवींचा 3-0 असा धुव्वा उडवला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचे कठीण लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण किवी संघ 41.2 षटकांत 295 धावा करुन सर्वबाद झाला.
न्यूझीलंडचा (New Zealand) संघ गेल्या 25 वर्षांपासून एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्याने सात मालिका खेळल्या असून सध्याच्या मालिकेत टीम इंडियाने तिसऱ्यांदा त्याला क्लीन केले आहे.
याआधी भारताने 1988-89 मध्ये न्यूझीलंडचा 4-0 असा क्लीन स्वीप केला होता. भारताने 2010 मध्ये दुसऱ्यांदा किवींचा 5-0 असा क्लीन स्वीप केला होता. आता, 2023 मध्ये, मंगळवार, 24 जानेवारी रोजी संपलेला तिसरा सामना जिंकून, भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-0 असा क्लीन स्वीप केला.
इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या या शानदार विजयाने भारताला (India) न्यूझीलंडविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये घरच्या मैदानावर सलग सातवा मालिका विजय मिळवून दिला. भारताने 1988-89 मध्ये प्रथमच न्यूझीलंडचे एकदिवसीय मालिकेत यजमानपद भूषवले, जी त्याने 4-0 ने जिंकली. यानंतर 1995-96 मध्ये 3-2, 1999 मध्ये 3-2, 2010 मध्ये 5-0, 2016 मध्ये 3-2 आणि 2017-18 मध्ये 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत भारताने 3-0 असा दणदणीत विजय मिळवला.
1988-89: टीम इंडिया 4-0 ने जिंकली
1995-96: टीम इंडिया 3-2 ने जिंकली
1999: टीम इंडिया 3-2 ने जिंकली
2010: टीम इंडिया 5-0 ने जिंकली
2016-17: टीम इंडिया 3-2 ने जिंकली
2017-18: टीम इंडिया 2-1 ने जिंकली
2022-23: टीम इंडिया 3-0 ने जिंकली
या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. रोहितने तीन वर्षांनंतर वनडेत शतक झळकावले. त्याने वनडे फॉरमॅटमधील 30 वे शतक झळकावून रिकी पाँटिंगची बरोबरी केली. शुभमनने या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. त्याने पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावले आणि या सामन्यात त्याने 112 धावांची खेळी खेळली. गिलने या तीन सामन्यांच्या मालिकेत 360 धावा करत बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली.
न्यूझीलंडच्या 395 धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने सर्वात मोठे योगदान दिले. त्याने 100 चेंडूत 138 धावांची खेळी खेळली ज्यात 12 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
या सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी भारतीय आक्रमणाचे नेतृत्व केले. दोघांनी 3-3 विकेट घेतल्या. तर दुसरा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने इंदूरच्या सपाट विकेटवर 2 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक यांना 1-1 बळी घेतले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.