IND vs NZ: हार्दिक-विराटमध्ये वाजलं? लाईव्ह सामन्यात उपकर्णधारानं केलं इग्नोर, Video Viral

विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत.
Hardik Pandya Ignore Virat Kohli
Hardik Pandya Ignore Virat KohliDainik Gomantak

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मंगळवारी वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ९० धावांनी विजय मिळवला.

पण असे असले तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी एक घटना या सामन्यादरम्यान पाहायला मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि वनडे संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात फूट पडल्याची चर्चा होत आहे. त्यातच आता एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात पंड्या विराटकडे दुर्लक्ष करत असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे.

Hardik Pandya Ignore Virat Kohli
IND vs NZ: कॅप्टन पंड्याचं टेंशन वाढलं! 'हा' धाकड फलंदाज होणार टी20 मालिकेतून बाहेर?

हा व्हिडिओ भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे दरम्यानचा आहे. यात दिसते की हार्दिकने न्यूझीलंडचा संघ 386 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यानंतर पहिल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर फिन ऍलेनला त्रिफळाचीत केले. पण यानंतर त्याने त्याच्या जवळ आलेल्या विराटला मागे टाकत अन्य खेळाडूंबरोबर विकेट मिळाल्याचा आनंद साजरा केला.

या व्हिडिओनंतर अनेकांना हार्दिकचे हे वर्तन भावलेले नाही. अनेक चाहत्यांनी याबाबतीत हार्दिकवर टीकाही केली आहे.

दरम्यान, हार्दिकने विराटकडे दुर्लक्ष करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही याच महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात हार्दिकने अशाचप्रकारे विराटकडे दुर्लक्ष केले होते. त्यावेळी विकेटचा आनंद साजरा करताना हार्दिकने दुर्लक्ष केल्याने विराटही काहिसा नाराज दिसला होता. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

याच सामन्यात त्याआधी फलंदाजी करताना दुसरी धाव घेण्यास नकार दिल्याने हार्दिकवर विराटने रागीट कटाक्ष टाकला होता. त्यानंतरच या दोघांमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे अंदाज चाहत्यांनी वर्तवले होते.

Hardik Pandya Ignore Virat Kohli
IND vs NZ: टीम इंडियाने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा, 25 वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा...!

आता पुन्हा अशाच प्रकारे व्हिडिओ समोर आल्याने विराट आणि हार्दिक यांच्यात फूट पडल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

हार्दिक करणार भारताचे नेतृत्व

भारताने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडे विजय मिळवल्याने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. भारताने पहिल्या दोन सामन्यातही विजय मिळवल होता. आता या वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत हार्दिक भारताचे नेतृत्व करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com