Team India  Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand, ODI: टीम इंडियात तीन मोठे बदल, सूर्या-ईशानलाही संधी; जाणून घ्या Playing XI

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला वनडे सामना हैदराबादला खेळवला जात आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand, 1st ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून वनडे मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात खेळलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांना अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या तिघांच्या जागेवर संधी मिळाली आहे. हे तिघेही या वनडे मालिकेचा भाग नाही.

तसेच न्यूझीलंड भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू अशा संघसंयोजनासह मैदानात उतरणार आहेत. या मालिकेसाठी केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे.

या मालिकेपूर्वी दोन्ही संघांनी त्याच्या अखेरच्या वनडे मालिकांमध्ये विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. भारताने श्रीलंकेला 3-0 आणि न्यूझीलंडने पाकिस्तानला 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ आता एकमेकांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड संघात आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 113 सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 55 सामने भारताने जिंकले आहेत, तर 50 सामने न्यूझीलंड संघाने जिंकले आहेत. तसेच 7 सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

(India vs New Zealand 1st ODI: Playing XI)

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ - फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिएल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

SCROLL FOR NEXT