India vs New Zealand: ईशान किशन 'या' जागेवर करणार बॅटिंग, कॅप्टन रोहितने स्पष्टच सांगितलं

रोहित शर्माने ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला होणार आहे. दरम्यान, पहिल्या वनडेच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळली आहे. या वनडे मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकले होते. पण या तिन्ही सामन्यांत ईशान किशनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. या मालिकेत केएल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती

विशेष म्हणजे ईशानने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतरही त्याला श्रीलंकेविरुद्ध न खेळवल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

Ishan Kishan
ICC T20 Rankings: ICC T20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंची चलती, ईशान किशनची धाकड कामगिरी

पण आता रोहितने ईशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात खेळवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या वनडे मालिकेसाठी काही कौटुंबिक कारणाने केएल राहुल अनुपस्थितीत आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारीही ईशान सांभाळेल.

रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी सांगितले की 'ईशान मधल्या फळीत फलंदाजी करेल. मला आनंद आहे की बांगलादेशविरुद्धच्या द्विशतकानंतर त्याला या मालिकेत खेळण्याची संधी मिळत आहे.'

ईशानने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 131 चेंडूत 210 धावा केल्या होत्या. तो सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्यानंतर वनडेत द्विशतक करणारा चौथाच भारतीय फलंदाज ठरला होता.

(Ishan will be batting middle-order says Rohit Sharma)

Ishan Kishan
Team India ची न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मालिकांसाठी घोषणा, ईशान-सूर्याला कसोटीत संधी, तर रोहित-विराट...

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत ईशान केएल राहुलच्या जागेवर खेळण्याची शक्यता आहे, तर या मालिकेतून श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे बाहेर पडला असल्याने सूर्यकुमार यादवलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

या मालिकेबद्दल रोहित म्हणाला, 'या मालिकेसाठी सज्ज होणे आमच्यासाठी सोपे आहे. आम्हाला फक्त एक संघ म्हणून सुधारणा करायच्या आहेत. न्यूझीलंड चांगले प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचे चांगले आव्हान असेल. आम्ही त्यांच्याविरुद्ध एक संघ म्हणून जे मिळवायचे आहे, त्यासाठी स्वत:ला आव्हान देऊ. न्यूझीलंड पाकिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर खेळण्यासाठी येत आहेत. त्यामुळे नक्कीच ते चांगले क्रिकेट खेळत आहेत.'

सध्या भारतीय फलंदाज देखील चांगल्या लयीत आहेत. विराट कोहलीनेही श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत दोन शतके केली होती. तसेच रोहित शर्मानेही चांगली कामगिरी केली होती. शुभमन गिलनेही शतक करत, तो देखील लयीत असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे आता आगामी काळातही ही लय कायम राहिल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com