India vs England 2nd T20 Dainik Gomantak
क्रीडा

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Sanju Samson Poor Form: भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन बाद होत आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मँचेस्टर: टी-२० विश्वकरंडक विजेत्या भारतीय क्रिकेट संघावर आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाला शानदार सुरुवात करता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आता दोन देशांमध्ये उद्या (ता. ४) दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. या वेळी संजू सॅमसन व तिलक वर्मा या दोन फलंदाजांचा सुमार फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

भारतीय संघाने यावर्षी मायदेशात पार पडलेला टी-२० विश्वकरंडक पटकावला. या विजेतेपदात संजू सॅमसन याने धडाकेबाज फलंदाजी करीत मोलाचा वाटा उचलला, मात्र आयर्लंड व इंग्लंड या दोन देशांविरुद्धच्या लढतींमध्ये त्याला अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. संजू सॅमसनचा सलामीचा जोडीदार अभिषेक शर्माने मागील तीन पैकी दोन लढतींमध्ये ४९ व ५९ अशा धावा फटकावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या समावेशाबाबत चोहोबाजूंनी चर्चा होताना दिसत आहे. संजू सॅमसनच्या सुमार फॉर्ममुळे वैभव सूर्यवंशीसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडे होऊ शकणार आहेत. अर्थात याचे उत्तर उद्याच मिळेल. संजू सॅमसनला वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर अपयशाचा सामना करावा लागला आहे. फलंदाजी तंत्रात त्याला सुधारणा करावी लागणार आहे.

भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन बाद होत आहे. वैभव सूर्यवंशीला खेळवण्याची घाई भारतीय संघ व्यवस्थापन करीत नाही, मात्र संजू सॅमसनचा सुमार फॉर्म कायम राहिल्यास वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात येऊ शकते.

मधल्या फळीत अपयश संजू सॅमसन याच्यासह भारताचा आणखी एक फलंदाज रडारवर असणार आहे. मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा हे त्याचे नाव. २०२६ मधील १२ टी-२० सामन्यांमध्ये त्याने फक्त १२ षटकार मारले आहेत. फिनीशर म्हणून तो अपयशी ठरीत आहे. यामुळे तिलक वर्मा यालाही फलंदाजीचा स्तर उंचवावा लागणार आहे.

फिरकी गोलंदाजांवर मदार

भारत-इंग्लंड यांच्यामधील मँचेस्टर येथील टी-२० लढतीत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला राहतो, मात्र कुलदीप यादव हा संघात नाही. यामुळे टीम इंडियाला अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई यांच्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. इंग्लंडचा संघ फलंदाजी विभागात तगडा असून, कर्णधार हॅरी ब्रुकसह फिल सॉल्ट, टॉम बँटन यांच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स । वेळ ः सायंकाळी ः ७ पासून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT