World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

World Legends Pro T20 League 2026: वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत १८ सामने होणार.
World Legends Pro T20 League
World Legends Pro T20 League Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत १८ सामने होणार असून त्यामध्ये जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंत चुरस राहील. सर्व सामने वेर्णा येथील १९१९ स्पोर्टस क्रिकेट स्टेडियमवर होतील.

स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे. सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकल क्लार्क स्पर्धेची लीग कमिशनर आहे. त्यांनी सांगितले, की “संघ आणि कर्णधार एकत्र येताना पाहणे अत्यंत उत्साहवर्धक आहे.

यापैकी अनेक खेळाडूंविरुद्ध मी माझ्या कारकिर्दीत खेळलो आहे. या दिग्गजांना पुन्हा मैदानावर पाहणे जुन्या आठवणी ताज्या करते. प्रत्येक संघ संतुलित असून अनुभव आणि टी-२० शैलीचा उत्तम संगम आहे.

World Legends Pro T20 League
Goa Crime: नुवे घरफोडीत 'पारधी गँग'चा हात, मायणा कुडतरी पोलिसांनी मुंबईत आवळल्या एकाच्या मुसक्या

चाहत्यांसाठी ही एक अविस्मरणीय क्रिकेटिंग मेजवानी ठरणार आहे.” सहभागी सहापैकी अव्वल चार संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य लढती तीन फेब्रुवारी रोजी, तर अंतिम लढत चार फेब्रुवारी रोजी होईल.

स्पर्धेतील संघ आणि खेळाडू

राजस्थान किंग्स ः कर्णधार: इऑन मॉर्गन, खेळाडू : बेन कटिंग, एल्टन चिगुंबुरा, नमन ओझा, कॅलम फर्ग्युसन, एंजेलो परेरा, जेपी ड्युमिनी, सुरेश रैना, बिपुल शर्मा, पिनाल शाह, जयकिशन कोळसावाला, अभिमन्यू मिथुन, अनुरित सिंग, जेसल कारिया, शदाब जकाती.

दिल्ली वॉरियर्स ः कर्णधार : हरभजन सिंग, खेळाडू ः सिक्कुग्गे प्रसन्ना, चॅडविक वॉल्टन, इम्रान ताहिर, कॉलिन इंग्राम, इरफान पठाण, इसुरू उदाना, शाहबाज नदीम, चिराग गांधी, श्रीवत्स गोस्वामी, गुरकीरत सिंग मान, राहुल शुक्ला, दिवेश पाठानिया, सुबोध भाटी, रवी जांगिड.

पुणे पँथर्स ः कर्णधार : कायरन पोलार्ड, खेळाडू ः सामिउल्लाह शिनवारी, उपुल थरंगा, अमित मिश्रा, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, मार्टिन गप्टिल, रॉबिन उथप्पा, कमिल लेव्हरॉक, राहुल यादव, असद पठाण, अंकित राजपूत, फैज फजल, प्रियांक पांचाल, ईश्वर पांडे.

दुबई रॉयल्स ः कर्णधार : शिखर धवन, खेळाडू ः समित पटेल, पियुष चावला, ख्रिस्तोफर एम्पोफू, फिडेल एडवर्ड्स, धनुष्का गुणतिलका, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, परवेझ रसूल, गीतांश खेऱ्हा, अभिषेक राऊत, पीटर ट्रेगो, मोनू कुमार, अमित वर्मा, कर्क एडवर्ड्स.

गुरुग्राम थंडर्स ः कर्णधार : थिसारा परेरा, खेळाडू ः फिल मस्टर्ड, रॉस टेलर, चेतेश्वर पुजारा, कॉलिन डी ग्रँडहोम, एस. श्रीसंत, स्टुअर्ट ब्रॉड, रायड एमरिट, जर्मेन ब्लॅकवूड, अमितोज सिंग, शेल्डन जॅक्सन, अक्षय वखारे, मालिंदा पुष्पकुमार, सौरिन ठाकर, पवन नेगी.

World Legends Pro T20 League
Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

महाराष्ट्र टायकून्स ः कर्णधार : दिनेश कार्तिक, खेळाडू ः कार्लोस ब्रेथवेट, डेल स्टेन, ख्रिस गेल, नेथन कूल्टर-नाईल, स्टुअर्ट बिन्नी, पीटर सिडल, शॉन मार्श, राहुल शर्मा, पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, बलतेज सिंग, मनविंदर बिसला, सिद्धार्थ कौल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com