Yashasvi Jaiswal  X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: पहिल्या दिवसाच्या खेळावर जयस्वालची मोहर, डबल सेंच्युरीकडे वाटचाल; भारत 300 धावांच्या पुढे

India vs England, 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वालने दमदार नाबाद दीडशतक केले असून आता त्याला पहिले द्विशतक करण्याची संधी आहे.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, 1st Day:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 93 षटकात 6 बाद 336 धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जयस्वालने नाबाद दीडशतक केले आहे.

विशाखापट्टणममधील डॉ. वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-वीडिसीए क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे भारताकडून रोहितसह यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला उतरला. या दोघांनी सुरुवात चांगली केली होती. त्यांच्यात 40 धावांची भागीदारीही झाली. मात्र रोहित 14 धावांवर पदार्पणवीर शोएब बशीरविरुद्ध खेळताना ओली पोपकडे झेल देत बाद झाला.

त्यानंतर काही आक्रमक फटके खेळत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलने जयस्वालला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही स्थिरावल्यानंतर 34 धावांवर माघारी परतला. त्याला अनुभवीन जेम्स अँडरसनने बाद केले.

यासह अँडरसनने सलग 22 व्या वर्षीय कसोटी विकेटही नावावर केली. तो असे करणारा पहिलाच गोलंदाज देखील आहे. त्याने 2003 पासून ते 2024 पर्यंत प्रत्येकवर्षी किमान एक तरी कसोटी विकेट घेतली आहे.

गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरला साथीला घेत जयस्वालने भारताचा डाव पुढे नेला. जयस्वाले नंतर आक्रमक फलंदाजीचा पवित्राही स्विकारला. त्यामुळे त्याने 151 चेंडूत त्याचे कसोटी कारकिर्गीतील दुसरे शतक पूर्ण केले. दरम्यान, अय्यरही 27 धावांवर बाद झाला.

त्यानंतर यासामन्यातून पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारने जयस्वालला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात 70 धावांची भागीदारी देखील झाली. मात्र, रजतही अन्य फलंदाजांप्रमाणे चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाला. त्याने 32 धावा केल्या.

सहाव्या क्रमांकावर बढती मिळालेला अक्षर पटेलही बशीरविरुद्ध खेळतानाच 27 धावांवर बाद झाला. जयस्वाल आणि अक्षर यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली.

दरम्यान, तीन, चार, पाच आणि सहाव्या क्रमांकावर खेळणारे फलंदाज एकाच डावात 25 ते 35 दरम्यान धावा करून बाद होण्याची ही कसोटीमधील पहिलीच वेळही ठरली.

अक्षर बाद झाल्यानंतर लोकल बॉल केएस भरतही फार काही करू शकला नाही आणि तोही 17 धावा करून बाद झाला. पण पहिल्या दिवसाच्या अखेरीस जयस्वाल मात्र 257 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 179 धावा करून नाबाद राहिला. तसेच त्याच्यासह आर अश्विन 5 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून पहिल्या दिवशी गोलंदाजीत शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि टॉम हर्टली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

Avatar 3 Trailer Launch: नव्या विलेनची एन्ट्री... 2100 कोटींच्या 'अवतार 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT