Rajat Patidar
Rajat PatidarX/BCCI

IND vs ENG: रणजीमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या पाटीदारचे आता टीम इंडियात पदार्पण, असे राहिले आत्तापर्यंतचे करियर

Rajat Patidar Debut: विशाखापट्टणमला होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून भारताकडून रजत पाटीदारचे पदार्पण झाले आहे.
Published on

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Rajat Patidar Debut:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरू झाला. या सामन्यातून भारताकडून 30 वर्षीय रजत पाटीदारचे कसोटी पदार्पण झाले आहे.

रजतला सामन्यापूर्वी भारताचा माजी गोलंदाज झहीर खानच्या हातून कसोटी पदार्पणाची कॅप प्रदान करण्यात आली. रजत भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 310 वा खेळाडू आहे. रजतने यापूर्वी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

दरम्यान, रजतवर या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे. कारण, विराट कोहली, केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत त्याला मधल्या फळीत महत्त्वाचे योगदान द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे त्याची विराट कोहलीचा बदली खेळाडू म्हणूनच या सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती.

रजत सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्याने या मालिकेपूर्वी इंग्लंड लायन्स (इंग्लंड अ संघ) विरुद्ध खेळताना दोन दिवसीय सराव सामन्यात आणि चार दिवसीय प्रथम श्रेणी सामन्यात शतक केले आहे.

खरंतर रजतला वेगवान गोलंदाज होण्याची इच्छा होती. मात्र 2014 मध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याने त्याचे लक्ष फलंदाजीकडे वळवले. 2019 पर्यंत त्याची कामगिरी क्रिकेटमध्ये समाधानकारक होती. मात्र, त्याने विशेष छाप पाडण्यास सुरुवात केली ती 2021 नंतर त्याने त्याच्या खेळात आणि तंत्रात केलेल्या काही बदलांमुळे त्याच्या खेळातही सुधारणा दिसून आली.

रजतने 2022 मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 सामन्यांत 658 धावा केल्या होत्या. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने त्या हंगामात मध्यप्रदेशला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला. त्याने 2022-23 रणजी ट्रॉफीमध्ये देखील 7 सामन्यात 47 च्या सरासरीने 565 धावा केल्या होत्या.

Rajat Patidar
IND vs ENG: एक दोन नव्हे, सलग 22 वर्षांचं सातत्य! गिलला आउट करताच अँडरसनने केलेला विश्वविक्रम मोडणे जवळपास अशक्य

आयपीएलमध्ये देखील रजतने आपला ठसा उमटवला आहे. त्याने 2022 मध्ये 8 सामन्यांत 55 च्या सरासरीने एका शतकासह 333 धावा केल्या आहेत.

मात्र 2023 मध्ये त्याला जवळपास 8 महिने दुखापतीमुळे दूर रहावे लागले होते. त्याच्या टाचेच्या जवळ शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण नंतर त्याने क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन करत आता भारतीय कसोटी संघातही जागा मिळवली.

Rajat Patidar
IND vs ENG: षटकारासह जयस्वालने झळकावलं दुसरं कसोटी शतक, BCCI ने शेअर केला तो खास क्षण

मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या रजतने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 55 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 45.97 च्या सरासरीने 4000 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 12 शतकांचा आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने 58 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळताना 1985 धावा केल्या आहेत. याशिवाय तो 50 टी20 सामने देखील खेळला असून त्यात त्याने 1640 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com