Cheteshwar Pujara | 100th Test | Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 'हे सोपं नव्हे!', टीम इंडियाकडून 100 व्या कसोटीच्या पुजाराला स्पेशल शुभेच्छा, पाहा Video

कारकिर्दीतील 100 वा कसोटी खेळणाऱ्या पुजाराला रोहित, विराटसह भारतीय संघातील खेळाडूंनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून (१७ फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियवर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. हा सामना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराचा कारकिर्दीतील 100 वा सामना असणार आहे.

त्याचमुळे पुजारासाठी हा सामना खास असून या सामन्यासाठी त्याचे कुटुंबिय देखील स्टेडियमवर उपस्थित राहाणार आहे. दरम्यान त्याला त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघातील सदस्य पुजाराला शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहलीसह अन्य खेळाडूही त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे.

रोहितने म्हटले आहे की 'तुला 100 व्या कसोटीनिमित्त शुभेच्छा. तू जे देशासाठी केले आहे, ते खूप जणांना मिळवता येत नाही.'

तसेच द्रविडने पुजाराबद्दलची एक आठवण सांगितली आहे. त्याने म्हटले आहे की 'मी पुजाराला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा त्याच्याविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये खेळलो होतो, त्यात त्याने धावा केल्या होत्या आणि त्यामुळे कर्नाटक संघ हरला होता. तो ज्याप्रकारे गेल्या १० वर्षात खेळलाय, ते पाहून छान वाटतंय.'

त्याचबरोबर विराटने म्हटले आहे की 'एका खास व्यक्तीसाठी खास दिवस असणार आहे. हा दिवस फक्त पुजारासाठीच नाही, तर त्याच्या कुटुंबियांसाठी आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी स्पेशल आहे.'

याशिवाय भारताचे जयदेव उनाडकट, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज प्ले स्टेशनवर खेळण्यावरून पुजाराची मस्करी करतानाही दिसत आहेत. तसेच नंतर ते त्याला १०० व्या कसोटीसाठी शुभेच्छाही देत आहेत.

पुजारा हा भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13 भारतीय असून यापूर्वी 12 खेळाडूंनी असा कारनामा केला आहे.

भारताकडून सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (105), इशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103), विरेंद्र सेहवाग (103) यांनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT