IND vs AUS: पुजारा करणार कांगारुंचा काटा लॉक, 100 व्या कसोटीत...

Cheteshwar Pujara: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.
Cheteshwar Pujara
Cheteshwar PujaraDainik Gomantak

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो 14 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला.

दरम्यान, भारताने (India) हा सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला, त्यामुळे पुजाराला दुसऱ्या डावात संधी मिळाली नाही. मात्र, दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत पुजाराला मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. पुजारासाठी हा सामना खूप खास असणार आहे, कारण तो 100 वा कसोटी सामना खेळणारा 13वा भारतीय खेळाडू ठरणार आहे.

Cheteshwar Pujara
IND vs AUS: कोटला मैदान टीम इंडियाचा 'अभेद्य किल्ला', रेकॉर्ड पाहून कांगारु थरथर कापतील!

दुसरीकडे, भारतीय फलंदाजीचा अविभाज्य भाग बनलेला पुजारा दुसरा कसोटी सामना संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करेल. पुजाराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याला फक्त एका शतकाची गरज आहे. जर त्याने हा टप्पा गाठला तर अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

तसेच, एक्टिव क्रिकेटपटूंच्या यादीत ही कामगिरी करणारा पुजारा पहिला फलंदाज ठरणार आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 39 सामन्यात 11 शतकांसह 3630 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) भारताकडून 100 कसोटी खेळणारा 13वा खेळाडू ठरणार आहे. या यादीत सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडसारखे दिग्गज खेळाडू आहेत.

Cheteshwar Pujara
IND vs AUS: कांगारुंच्या सरावाच्या योजनेवर फिरले पाणी, दिग्गजाची ICC कडे कारवाईची मागणी

भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले खेळाडू-

 • सचिन तेंडुलकर - 200

 • राहुल द्रविड - 163

 • व्हीव्हीएस लक्ष्मण - 134

 • अनिल कुंबळे - 132

 • कपिल देव - 131

Cheteshwar Pujara
IND vs AUS: केएल राहुलच्या फ्लॉप शो वर चिडला व्यंकटेश प्रसाद; 'काही भाग्यवान असतात, तर...'
 • सुनील गावस्कर - 125

 • दिलीप वेंगसरकर - 116

 • सौरव गांगुली - 113

 • विराट कोहली - 105*

 • ईशांत शर्मा - 105

 • हरभजन सिंग - 103

 • वीरेंद्र सेहवाग - 103

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com