Pranali Kodre
चेतेश्वर पुजारा भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो.
पुजाराने 25 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
पुजाराचा जन्म गुजरातमधील रोजकोट येथे 1988 साली झाला होता.
त्याला क्रिकेटचे बाळकडू घरातूनच मिळाले.त्याचे वडील अरविंद पुजारा हे 6 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, तसेच त्याचे काका बिपीन पुजारादेखील रणजी सामने खेळले आहेत.
पुजारा अडीच-तीन वर्षांचा असताना त्याचा क्रिकेट खेळतानाचा एक फोटो त्याच्या वडिलांनी पाहिला, त्यावेळी त्यांनी तो क्रिकेट खेळू शकतो हे ओळखले.
चेतेश्वर पुजाराने लहानपणी अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती.पण नंतर माजी भारतीय क्रिकेटपटू कारसन घावरी यांनी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
पुजाराने वयोगटातील क्रिकेट स्पर्धा गाजवल्या होत्या.
मात्र, तो लहान असताना त्याला दुखापती होतील म्हणून त्याच्या वडिलांनी पतंग उडवण्यापासून, दांडीया खेळण्यापासून रोखले होते.
तो क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत असतानाच ऑक्टोबर 2005 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले.
पण त्यानंतर तो क्रिकेटबाबत गंभीर झाला आणि आईचे त्याने भारतासाठी खेळावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागला.
अखेर त्याने 2010 साली भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले.
त्यानंतर त्याने 2013 साली वनडेतही पदार्पण केले होते, पण तो वनडे क्रिकेटमध्ये केवळ 5 सामने खेळू शकला.
मात्र, कसोटीत त्याने अनेक मोठे विक्रम केले. त्याने कसोटीत 103 सामन्यांमध्ये 7000 हजारांहून अधिक धावा करताना 19 शतके आणि 35 अर्धशतके केली.
त्याचबरोबर 2005 साली सौराष्ट्राकडून प्रथम श्रेणीमध्ये पाऊल ठेवलेल्या पुजाराने भारतात 12 हजार प्रथम श्रेणी धावाही पूर्ण केल्या.
त्याने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटही खेळले आहे.
पुजाराने 2013 साली पुजा पाबरीबरोबर लग्न केले. त्यांना आता आदिती नावाची एक मुलगीही आहे.