Pat Cummins | Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: स्मिथ की कमिन्स, चौथ्या कसोटीत कोण करणार ऑस्ट्रेलियाची 'कॅप्टन्सी'? मोठी अपडेट आली समोर

चौथ्या कसोटीसाठी पॅट कमिन्स पुन्हा भारतात परतणार की नाही, याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठी अपडेट दिली आहे.

Pranali Kodre

Pat Cummins: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सध्या बॉर्डर-गासवकर ट्रॉफी ही कसोटी मालिका सुरू आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणार आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या उपस्थितीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार कमिन्स चौथ्या कसोटीसाठी अनुपस्थित राहाणार आहे. त्यामुळे उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसेल. कमिन्स तिसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध होता, त्यामुळे इंदूरला झालेल्या या कसोटीत स्मिथनेच ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

विशेष म्हणजे पहिल्या दोन कसोटी ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध पराभवाचा सामना केला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेतील भारताची आघाडी २-१ अशी कमी केली.

(Pat Cummins ruled out from fourth Test, Steve Smith will again captain Australia team)

कमिन्सची आई आजारी

कमिन्सची आई सध्या स्तनाच्या कर्करोगामुळे आजारी आहे. त्याचमुळे तो भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर सिडनीला परतला होता. त्याने कुटुंबाला सध्या प्राधान्य दिले असल्याने तो अद्याप भारतात परतलेला नाही. त्याच्या या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला असून त्याच्याबरोबर ते उभे असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आता स्मिथ कसोटी मालिकेनंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतात परतणार का नाही, याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तो ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचाही कर्णधार आहे.

स्मिथला कर्णधारपदाचा अनुभव

स्मिथला ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने यापूर्वी स्मिथने 2014 ते 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियाचे नियमितपणे नेतृत्व केले होते. पण चेंडू छेडछाडी प्रकरणामुळे कर्णधारपद त्याला गमवावे लागले होते. त्यानंतर त्याची बंदी उठल्यानंतर त्याला पुन्हा कसोटी संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे.

दरम्यान, स्मिथने त्याला पुन्हा पूर्णवेळ कर्णधार बनण्याची महत्त्वकांक्षा नसल्याचे तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरच स्पष्ट केले आहे. पण याबरोबरच भारतात त्याला नेतृत्व करायला आवडते असेही त्याने म्हटले होते.

तो म्हणाला होता, 'माझी वेळ आता संपली असून आता हा पॅट कमिन्सचा संघ आहे. मी या आठवड्यात नेतृत्व केले होते, कारण कमिन्स घरी गेला आहे. आमच्या संवेदना त्याच्याबरोबर आहेत. भारत असे ठिकाण आहे, जिथे मला नेतृत्व करायला आवडते. कदाचीत नेतृत्व करण्यासाठी जगातील माझे सर्वात आवडते ठिकाण आहे.'

स्मिथने आत्तापर्यंत भारतात 5 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यातील 2 सामने त्याने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्याचबरोबर त्याने 2 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

मालिकेत पराभव टाळण्याचे आव्हान

दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे अहमदाबादला होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका पराभव टाळण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

झाय रिचर्डसन वनडे मालिकेतून बाहेर

झाय रिचर्डसनला नुकतीच पुन्हा एकदा हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो भारताविरुद्ध १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात नॅथन एलिसचा समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT