Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Ismail Khatib Assassinated: इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येचा धक्का ताजा असतानाच, आता इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हेदेखील इस्रायली हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला.
Ismail Khatib Assassinated
Ismail Khatib AssassinatedDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ismail Khatib Assassinated: इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या भीषण युद्धाला 19 दिवस उलटले असून या संघर्षात इराणने आपले एकामागून एक दिग्गज नेते गमावले आहेत. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येचा धक्का ताजा असतानाच आता इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब हेदेखील इस्रायली हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला. 'एपी'च्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांच्यानंतर इस्माइल खातिब यांचा अंत होणे हा इराणसाठी सर्वात मोठा लष्करी आणि राजनैतिक फटका मानला जात आहे.

इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री काट्झ यांनी या मोहिमेनंतर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, "पंतप्रधान नेतन्याहू आणि मी इस्रायल डिफेन्स फोर्सेसला विशेष अधिकार दिले आहेत. यानुसार, इराणच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची गुप्त माहिती मिळताच आणि ऑपरेशनची संधी मिळताच कोणतीही अतिरिक्त परवानगी न घेता त्यांना कंठस्नान घालण्याचे आदेश देण्यात आले." तसेच, आजच्या दिवसात सर्व आघाड्यांवर आणखी धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण घटना घडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Ismail Khatib Assassinated
Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

इराणसाठी (Iran) अली लारीजानी आणि इस्माइल खातिब या दोघांचा मृत्यू म्हणजे सत्तेचा कणा मोडण्यासारखे आहे. लारीजानी हे इराणच्या सुरक्षा धोरणांचा मुख्य चेहरा होते आणि पाश्चात्य देशांशी झालेल्या अणू चर्चेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तझा लारीजानी आणि कार्यालय प्रमुख अलीरेझा बयात हेदेखील मारले गेले आहेत. तर दुसरीकडे, आयडीएफच्या ताज्या हल्ल्यात मारले गेलेले इस्माइल खातिब हे इराणच्या शक्तिशाली गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख होते. इस्रायली सूत्रांनुसार, खातिब यांच्यासोबत मंत्रालयाचे अन्य चार वरिष्ठ अधिकारीही या हल्ल्यात ढेपाळले आहेत.

Ismail Khatib Assassinated
Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

या 19 दिवसांच्या युद्धात इराणने आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह सुमारे 40 वरिष्ठ लष्करी आणि राजकीय नेत्यांना गमावले आहे. 28 फेब्रुवारी रोजी खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती, जी आता लारीजानी आणि खातिब यांच्या मृत्यूने अधिक गडद झाली. या युद्धात आतापर्यंत मारल्या गेलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीत सुरक्षा सल्लागार अली शामखानी, आयआरजीसी कमांडर मोहम्मद पाकपूर, संरक्षण मंत्री अझीझ नसीरजादेह, सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दोलरहीम मुसावी आणि बसिज फोर्सचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी यांचा समावेश आहे. याशिवाय, आयआरजीसीचे अनेक जनरल आणि अणू कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञही इस्रायल-अमेरिका युतीचे लक्ष्य ठरले आहेत.

Ismail Khatib Assassinated
Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

इस्रायल आणि अमेरिकेचे संयुक्त हल्ले थेट इराणची लष्करी कमान, क्षेपणास्त्र तळ आणि सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करत आहेत. इराणकडूनही प्रत्युत्तरादाखल इस्रायल आणि अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरु असले, तरी नेतृत्वाची झालेली हानी इराणला कमकुवत करत आहे. इस्रायलने या मोहिमेला "एक्सिस ऑफ इव्हिल" विरुद्धचा सर्वात मोठा विजय म्हटले. अद्याप इराणने गुप्तचर मंत्री खातिब यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केलेली नाही, मात्र इस्रायलच्या दाव्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

donald trump mojtaba khamenei
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
US Iran War Pentagon Audit Report 2026
Iran Missile Attack US Bases Jordan Bahrain
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com