IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत 'या' खेळाडूला नक्की संधी मिळणार, द्रविडने दिला इशारा!

IND vs AUS 4th Test, Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.
India Test Team
India Test Team Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS 4th Test, Playing 11: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील चौथा सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. हा सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे.

याआधी, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यजमानांकडे 2-1 अशी आघाडी असली तरी. दरम्यान, अहमदाबाद कसोटीबाबत वृत्त आहे की, या सामन्यात अनुभवी खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.

भारतीय खेळाडू इंदूरमध्ये सराव करत आहेत

तिसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दारुण पराभवानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघातील काही खेळाडूंनी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सराव केला.

हे सराव सत्र 90 मिनिटे चालले. हे सत्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या उपस्थितीत पार पडले.

India Test Team
IND vs AUS: 'झुकेगा नही साला...', कसोटी जिंकताच ऑसी फॅनने भारतीय चाहत्यांना डिवचलं; Video Viral

गिल आणि अय्यर यांनीही सराव केला

संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल, मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा, डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी नेट सरावात भाग घेतला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अतिशय टर्निंग विकेटवर खेळला गेला. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रातच ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला.

India Test Team
IND vs AUS: वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार नाही? BCCI ने दिली मोठी अपडेट

कुलदीपला संधी मिळेल का?

चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने नेटमध्ये बराच वेळ गोलंदाजी केली. मालिकेतील तिन्ही सामन्यांमधून तो बाहेर आहे, पण त्याने ज्या पद्धतीने नेट-सराव केला, त्यानुसार तो चौथ्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकतो, असे दिसते.

याचे एक मोठे कारण असेही म्हणता येईल की, जेव्हा तो सराव करत होता तेव्हा राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडही जवळ उभे होते. इतर चार खेळाडूंनी स्थानिक गोलंदाज आणि थ्रो डाऊन विरुद्ध फलंदाजीचा सराव घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com