PM Narendra Modi & Team India
PM Narendra Modi & Team IndiaDainik Gomantak

Ind Vs Aus: PM मोदी अहमदाबाद टेस्टचा लुटणार आनंद, टीम इंडियाची लागणार कसोटी

PM Narendra Modi Cricket Match: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च रोजी गुजरातला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी स्टेडियमवर बसून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी पाहतील.

PM Narendra Modi Cricket Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. 9 ते 13 मार्च दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील.

इंदूर कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने भारतावर 9 गडी राखून मात केली.

दरम्यान, टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला फक्त 76 रन्सचं टार्गेट दिलं होतं, जे कांगारु टीमनं सहज गाठलं. मालिकेत भारत अजूनही 2-1 ने पुढे आहे. भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला किंवा सामना अनिर्णित राहिला तरी मालिका विजय त्याच्या वाट्याला येईल.

PM Narendra Modi & Team India
IND vs AUS, 3rd Test: ऑस्ट्रेलियाने इंदूरचं मैदान मारलं! भारताचा 9 विकेट्सने लाजीरवाणा पराभव

दुसरीकडे, चौथ्या कसोटीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मार्च रोजी गुजरातला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी स्टेडियमवर बसून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी पाहतील.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानीज हे देखील त्यांच्यासोबत असतील. राज्यभरातून भाजपचे कार्यकर्तेही कसोटी सामना पाहण्यासाठी येणार आहेत. माहितीनुसार, सुमारे 500 कार्यकर्ते क्रिकेट सामन्याचा आनंद लुटतील.

तिसऱ्या कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, इंदूरमध्ये टीम इंडियाने अतिशय लाजिरवाणी कामगिरी केली. टीम इंडियाचे फलंदाज पहिल्या डावात किंवा दुसऱ्या डावातही कमाल दाखवू शकले नाहीत. केवळ चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 59 धावांची खेळी करु शकला.

PM Narendra Modi & Team India
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची WTC Final मध्ये एन्ट्री, पण टीम इंडियाची प्रतिक्षा लांबली; पाहा समीकरण

तसेच, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाला निश्चितच झटका बसला पण स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन यांनी 78 धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. त्याचवेळी, नॅथन लायनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी भारताचा डाव 60.3 षटकांत सर्वबाद 163 धावांवर आटोपला आणि कांगारुंना विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य दिले. गोलंदाज नॅथन लायनने दोन्ही डावात 11 विकेट घेतल्या.

PM Narendra Modi & Team India
IND vs AUS 3rd Test: जिद्दी स्टार्क! बोटातून रक्त येत होते, तरीही तो बॉलिंग करत राहिला...; Video Viral

शिवाय, तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाला सुरुवात केली. मात्र, अश्विनच्या चेंडूवर ख्वाजा शून्यावर बाद झाला. त्यानंतर, मार्नस लॅबुशेनने क्रीझवर येऊन डाव पुढे नेला. शानदार फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांनी 78 धावांची भागीदारी करत संघाला भारताविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com