Mapusa Accident: म्हापसातील करसवाडा येथे ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Mapusa Accident News: म्हापसा येथील करसवाडा येथे सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली.

म्हापसा येथील करसवाडा येथे सुरु असलेल्या एका बांधकाम साइटवर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र, अत्यंत सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणतीही जीवितहानी नोंदवण्यात आलेली नाही. माहिती मिळताच संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com