Team India  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाचा 'हा' फ्लॉप खेळाडू बेंचवर बसणार हे नक्की, कॅप्टन रोहित...!

India vs Australia 4th Test, Playing 11: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत तीन सामन्यांनंतर 2-1 अशी आघाडी कायम राखत आहे.

Manish Jadhav

India vs Australia 4th Test, Playing 11: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत तीन सामन्यांनंतर 2-1 अशी आघाडी कायम राखत आहे.

या मालिकेतील चौथा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे, त्यासाठी तयारी सुरु आहे. सध्या दोन्ही संघ इंदूरमध्येच आहेत. दरम्यान, अनेक क्रिकेटप्रेमींना प्लेइंग-11 मध्ये बदलाची अपेक्षा आहे.

मालिकेतील शेवटची कसोटी 9 मार्चपासून सुरु होणार आहे

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे, जेव्हा भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया 9 मार्चपासून आमनेसामने असतील.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडी राखून पराभव केला.

अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने (Australia) मालिकेत पहिला विजय नोंदवला. विशेष म्हणजे, आतापर्यंत मालिकेतील तिन्ही सामने 3-3 दिवसांत संपले.

कर्णधार रोहित सिराजला वगळणार?

आकडेवारी पाहता अहमदाबाद कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी दिली जाणार नाही, असे मानले जात आहे. कर्णधार रोहितने आतापर्यंत तिन्ही सामन्यांमध्ये त्याला मैदानात उतरवले आहे.

त्याला प्लेइंग-11 चा भाग बनवले आहे. त्याच्या जागी वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

दुसरीकडे, वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतून शमीला विश्रांती देण्यात आली होती.

संघ व्यवस्थापनाने वैद्यकीय कर्मचार्‍यांशी सल्लामसलत करुन, आयपीएलचे बहुतेक सामने खेळणार्‍या आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांमध्ये सहभागी असलेल्या वेगवान गोलंदाजाच्या वर्कलोड व्यवस्थापनाची योजना आखली आहे.

शमीने या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळले. तो तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचाही एक भाग आहे.

सिराजला 3 कसोटी सामन्यात फक्त एकच बळी घेता आला आहे

नागपुरात, सिराजने दोन्ही डावात गोलंदाजी केली, पण त्याला फक्त 1 बळी घेता आला. यानंतर दिल्ली कसोटीत त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर त्याला इंदूर कसोटीतही संधी देण्यात आली, मात्र तिथेही तो अपयशी ठरला.

आता कर्णधार रोहित शर्मा त्याला अहमदाबाद कसोटी सामन्यात संधी देणार नसल्याचे मानले जात आहे. सध्याच्या मालिकेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याला आतापर्यंत केवळ एकच बळी घेता आला आहे. रिव्हर्स स्विंगसाठी अनुकूल मोटेराच्या कोरड्या खेळपट्टीवर शमी प्रभावी ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

SCROLL FOR NEXT