IND vs AUS: 'पाकिस्तानातील कसोटी बोरिंग झाल्या, म्हणूनच...' कॅप्टन रोहितचं टीकाकारांना चोख उत्तर

India vs Australia कसोटी मालिकेतील पहिले तिन्ही सामने तीन दिवसांच्या आतच संपले आहेत. याबद्दल कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma on 5 days Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरला कसोटी मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या (3 मार्च) पहिल्या दीड तासातच ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे याबद्दल बरीच चर्चा झाली. आता यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या कसोटी भारताने दिलेल्या 76 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 18.5 षटकातच 1 विकेट गमावत पूर्ण केला. दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सलग तिसरा सामना तिसऱ्या दिवशी संपला आहे. त्यामुळे सध्या या सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबद्दल चर्चा होत आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma Video: कर्णधार असावा तर असाच! हिटमॅनचा पुजारासाठी 'त्याग' पाहून बॉलिवूड स्टारही भारवला

याबद्दल जेव्हा रोहितला सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी तो म्हणाला, 'मी काय म्हणून यावर, 5 दिवस सामना चालण्यासाठी खेळाडूंना खूप चांगले खेळावे लागते. भारताबाहेरही अनेक सामने पाच दिवस चालत नाहीत. कालच दक्षिण आफ्रिकेत तीन दिवसात सामना संपला.'

'ही गोष्ट खेळाडूंच्या कौशल्याबद्दल आहे. खेळाडूंना कौशल्य आत्मसात करता आली पाहिजेत. जर खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असेल, तर फलंदाजांच्या कौशल्याची पारख केली जाते. प्रत्येकवेळी सपाट खेळपट्टीवर खेळणे महत्त्वाचे नसते, नाहीतर मग निकालच लागणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये तीन कसोटी झाल्या. लोक त्या सामन्यांना कंटाळवाणे म्हणाले होते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठीच सामने रोमांचक बनवत आहोत.'

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळाली. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी पहिल्या दोन दिवसातच अधिक विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रलियाच्या अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीवर टीका केली होती. या टीकेलाही रोहितने उत्तर दिले आहे.

Rohit Sharma
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाची WTC Final मध्ये एन्ट्री, पण टीम इंडियाची प्रतिक्षा लांबली; पाहा समीकरण

रोहितने म्हटले आहे की, 'मालिकेच्या आधीच आम्ही ठरवले होते की आम्हाला कशाप्रकारच्या खेळपट्टी हव्या आहेत. हा आमचा एकत्रित निर्णय होता. आमचा हेतू आमच्याच फलंदाजांवर दबाव आणने असा नव्हता. आम्ही जेव्हा जिंकतो, तेव्हा सर्व छान दिसते. त्यावेळी फलंदाजीबद्दल चर्चा जास्त होत नाही. पण, जेव्हा पराभूत होतो, तेव्हा मात्र अशा गोष्टी प्रकाशझोतात येतात. आम्हालाही माहित आहे आम्ही आव्हानांना तोंड देऊ शकतो.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रलियाने या विजयासह कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे.

तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी सामना अहमदाबादला ९ मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून किंवा अनिर्णित राखून भारताला मालिकेत विजय मिळवण्याची संधी आहेत, तर ऑस्ट्रेलियाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com