India vs Australia ODI Series, Captaincy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जात आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
कसोटी मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एकदिवसीय मालिकेतील त्याच्या कर्णधारपदाबाबत आधीच अपडेट दिले आहे. काही लोकांना याबाबत माहिती नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर झाला आहे. दिल्लीत मालिकेतील दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर काही तासांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली होती.
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार नाही. खुद्द बीसीसीआयनेच (BCCI) ही माहिती दिली आहे.
संघाची घोषणा करण्यासोबतच बीसीसीआयने सांगितले की, रोहित शर्मा मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद स्वीकारणार नाही. तो या सामन्याचा भाग असणार नाही. कौटुंबिक कारणांमुळे रोहित संघाचा भाग होऊ शकणार नाही. या काळात अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे.
ईशान किशनचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. रवींद्र जडेजालाही (Ravindra Jadeja) स्थान देण्यात आले आहे, पण अश्विन संघाचा भाग नाही. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार – शेवटचे 2 वनडे), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेट-कीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.