Team India BCCI
क्रीडा

India vs Australia: दुसऱ्या T20 मध्ये पावसाचा अडथळा? काय आहेत तिरुवनंतपुरममधील हवामान अंदाज, घ्या जाणून

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये रंगणार असून तेथे रविवारी कसे वातावरण असणार आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd T20I Match at Thiruvananthapuram, Weather Updates:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 23 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (26 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे.

दरम्यान, सध्या भारतातील अनेक राज्यात पावसाचे अंदाज आहेत, त्यामुळे या सामन्यादरम्यानही पावसाचा अडथळा येणार का असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

पावसाचा अंदाज असलेल्या राज्यांमध्ये केरळचाही समावेश आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यावरही पावसाची टांगती तलवार आहे.

दरम्यान, AccuWeather च्या रिपोर्टनुसार रविवारी तिरुवनंतपुरममध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, पाऊस दुपारी होणार आहे. तसेच नंतर संध्याकाळ ५ नंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, पण पावसाची शक्यता संध्याकाळी खूप कमी आहे. त्याचमुळे हा सामना होण्याची शक्यता आहे. याशिवाय ढगाळ वातावरणामुळे गोलंदाजांना मदतही मिळण्याची शक्यता आहे.

भारताला आघाडी घेण्याची संधी

या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमला झाला होता. त्या सामन्यात भारताने 209 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले होते आणि 2 विकेट्सने विजय मिळवला होता.

या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्याची संधी भारताकडे असणार आहे. तसेच मॅथ्यू वेडच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

    (श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार असेल.)

  • ऑस्ट्रेलिया संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेडस जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT