IND vs AUS: सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने T20 मध्ये रचला नवा विश्वविक्रम; द. आफ्रिकेला पछाडलं

Team India T20 Record: भारतीय संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांचा यशस्वी पाठलाग करत नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
Suryakumar Yadav - Ishan Kishan
Suryakumar Yadav - Ishan KishanPTI
Published on
Updated on

India vs Australia, 1st T20I Match at Visakhapatnam:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर चारच दिवसात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ टी20 मालिकेसाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या टी20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणमला पार पडला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने एक खास विक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताला या सामन्यात 209 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही पाचवी वेळ होती.

त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. याबाबत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

Suryakumar Yadav - Ishan Kishan
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणार पाच T20 मॅचचा थरार! केव्हा अन् कुठे पाहाणार सिरीज, घ्या जाणून

भारताने यापूर्वी 2013 साली राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 सामन्यात 202 धावांचे आव्हान पूर्ण केले होते, त्याआधी 2009 साली मोहालीत झालेल्या टी20 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताने 207 धावांचे आव्हान पूर्ण केले होते.

त्याचबरोबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या टी20 सामन्यात भारताने 208 धावांचे आव्हान पूर्ण केले होते, तर 2020 साली ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात भारताने 204 धावांचे आव्हान पूर्ण केले होते.

  • आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ -

    • 5 वेळा - भारत

    • 4 वेळा - दक्षिण आफ्रिका

    • 3 वेळा - पाकिस्तान

    • 3 वेळा - ऑस्ट्रेलिया

Suryakumar Yadav - Ishan Kishan
IND vs AUS: रिंकूने शेवटच्या बॉलवर सिक्स मारूनही मिळाल्या नाहीत सहा धावा, पण का? घ्या जाणून

भारताचा विजय

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 80 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या, तर यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा आणि रिंकू सिंगने 14 चेंडूत 22 धावांची छोटेखानी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com