IRE vs IND T20I Dainik Gomantak
क्रीडा

IRE vs IND T20I: T20 च्या इतिहासात कुणाचा वरचष्मा? जसप्रीत बुमराहसमोर असणार 'हे' आव्हान

Manish Jadhav

IRE vs IND T20I: भारतीय संघाला 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहची या दौऱ्यासाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयर्लंडला घरच्या मैदानावर हरवण्यासाठी तो युवा खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे. टी-20 च्या इतिहासात टीम इंडियाचा आयर्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. मात्र, जसप्रीत बुमराहसमोर मोठे आव्हान असेल.

T20 मध्ये आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया हेड-टू-हेड

आयर्लंड आणि टीम इंडिया (Team India) यांच्यात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. भारताने 2009 मध्ये पहिला टी-20 सामना खेळला होता. तर 28 जून 2022 रोजी आयर्लंड विरुद्ध शेवटचा T20 सामना खेळला गेला होता.

टीम इंडियासमोर हे आव्हान असणार

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाची आकडेवारी टी-20 च्या इतिहासात उत्कृष्ट आहे. अशा परिस्थितीत भारताला (India) अजिंक्य ठेवण्याचे आव्हान कर्णधार जसप्रीत बुमराहवर असणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली असून त्यात रिंकू सिंह, तिलक वर्मा या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यात होणार्‍या टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

दुसरा टी-20 सामना 20 ऑगस्टला खेळवला जाणार आहे.

तिसरा टी-20 सामना 23 ऑगस्टला होणार आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई , प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT