IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाला मिळणार नवा कोच! 'हा' माजी खेळाडू सांभाळणार जबाबदारी

India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यासाठी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Team India New Head Coach For Ireland tour: भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा १३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेचच १८ ऑगस्टपासून भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर टी२० मालिका खेळायची आहे.

दरम्यान, आयर्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अनेक प्रमुख खेळाडूंना आणि मुख्य सपोर्ट स्टाफला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या दौऱ्यावर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजत आहे.

भारतीय संघाचा नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड आयर्लंड दौऱ्यावेळी विश्रांतीवर असणार आहे. त्याचमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण प्रभारी प्रशिक्षक म्हणून आयर्लंड दौऱ्यावर जाईल, अशी चर्चा होती.

मात्र काही मीडियातील रिपोर्ट्सनुसार त्याला आगामी हाय-परफॉर्मन्स ट्रेनिंग कॅम्पचे निरिक्षण करायचे आहे. हा कॅम्प तीन आठवडे चालणार आहे. त्याचमुळे तो आयर्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध राहू शकत नाही.

Team India
विंडिजविरुद्ध पराभव : World Cup 2023 तोंडावर आलेला असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारे 3 फॅक्टर

नवा प्रशिक्षक

अनेक रिपोर्ट्सनुसार देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू सितांशू कोटक यांच्याकडे आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद दिले जाईल. सितांशू एनसीएमध्ये भारतीय अ संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तसेच आयर्लंड दौऱ्यादरम्यान सितांशू यांच्याबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले देखील जाण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की 'सितांशू आणि साईराज हे जसप्रीत बुमराह कर्णधार असलेल्या भारतीय संघासह तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आयर्लंडला जातील.

लक्ष्मण 16 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या हाय-परफॉरमन्स कॅम्पची जबाबदारी सांभाळणार आहे. ज्यात बीसीसीआयने निवड केलेल्या अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रभसिमरन सिंग, साई सुदर्शन, आकाश सिंग, राजवर्धन हंगारगेकर, दिव्यांश सक्सेना अशा खेळाडूंचा समावेश आहे.'

Team India
India vs Ireland: भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंड संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

भारताचा आयर्लंड दौरा

भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. जी 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर दुसरा सामना 20 ऑगस्ट रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.

भारतीय संघाच्या निवड समितीने आयर्लंड दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे, तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना टी-20 मालिकेतही संधी मिळाली आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहला देण्यात आले आहे. बुमराह याच मालिकेतून तब्बल १० महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन देखील करणार आहे. तसेच या संघाचे उपकर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे.

  • आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com