Australia - New Zealand 
क्रीडा

World Cup 2023: भारत-द. आफ्रिका सेमी-फायनलमध्ये, तर दोन जागांसाठी 6 संघात स्पर्धा, जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Equation: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेने सेमी-फायनलमध्ये प्रवेश केला असला, तरी अद्याप उर्वरित दोन जागांसाठी 6 संघात स्पर्धा आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Semi-Final Equation:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे झुकत आहे. त्यामुळे आता स्पर्धेलाही रोमांचक वळण मिळाले आहे. उपांत्य फेरीत चार संघच प्रवेश करणार आहेत.

यातील भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे अजून दोनच संघांना संधी आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचमुळे सध्या उपांत्य फेरीत उर्वरित दोन जागांसाठी 6 संघात स्पर्धा आहे.

रविवारी (5 नोव्हेंबर) भारताने कोलकाताला झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले; त्यामुळे भारताचे गुणतालिकेतील अव्वल स्थानही पक्के झाले आहे. तसेच दक्षिण आफ्रिका सध्या 8 सामन्यांनंतर 6 विजयांसह 12 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहू शकतो.

सध्या गुणतालिकेनुसार तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तसेच चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांचे 8 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यांचे 8 गुण आहेत.

या दोन्ही संघांना सध्या उपांत्य फेरीत जाण्याची सर्वात जास्त संधी आहे. पण याबरोबरच त्यांची स्पर्धा पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांबरोबर आहे.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत थेट पोहोचायचे असेल, तर केवळ एक सामना जिंकण्याची गरज आहे. ते एक विजय मिळवून 12 गुणांसह गुणतालिकेत दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळवू शकतात.

तसेच जरी ते दोन्ही सामने पराभूत झाले, तरी त्यांना आशा करावी लागेल की न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान या तीन संघांपैकी किमान दोन संघांनी 10 गुणांपर्यंत पोहचू नये, किंवा पोहचले तरी त्यांचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियाहून कमी असावा.

न्यूझीलंड

त्याचबरोबर न्यूझीलंडला जर उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर काहीही करून श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल, याबरोबरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने त्यांचे उर्वरित सामने पराभूत व्हावेत अशी आशा करावी लागेल.

त्याचबरोबर जरी ते उर्वरित सामना पराभूत झाले, तरी त्यांना ही आशा करावी लागणार आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ आपापले सामने पराभूत होतील. तसेच श्रीलंका आणि नेदरलँड्स संघांनी आपापले सामने जिंकले तरी त्यांचा नेटरनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी असावा.

पाकिस्तान

पाकिस्तान संघाने आत्तापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचेही न्यूझीलंडप्रमाणे 8 गुण आहेत. मात्र त्यांचा नेटरनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी आहे. दरम्यान पाकिस्तानसमोरही न्यूझीलंडप्रमाणेच समीकरण आहे. त्यांना उर्वरित इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.

त्याचबरोबर आशा करावी लागेल की न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान त्यांचे उर्वरित सामने पराभूत व्हावेत. त्याचबरोबर जरी ते हा सामना पराभूत झाले, तरी त्यांना ही आशा करावी लागेल की न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या 8 गुणांपर्यंत पोहलेल्या किंवा पोहोचणाऱ्या संघांचा नेटरनरेट त्यांच्यापेक्षा कमी असावा.

अफगाणिस्तान

दरम्यान, अफगाणिस्तानने 7 सामने आत्तापर्यंत खेळले असून 4 सामने जिंकले आहेत आणि 8 गुण मिळवले आहेत. त्यांनाही थेट उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना उर्वरित ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकावेच लागणार आहे.

त्याचबरोबर एका विजयासह देखील ते उपांत्य फेरीत पोहचू शकतात, पण त्यासाठीही त्यांना आशा करावी लागेल की न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघ 10 गुणांपर्यंत पोहचू नयेत, त्याचबरोबर जरी ते पोहचले, तरी त्यांचा नेटरनरेट त्यांच्यापेक्षा कमी असावा.

तसेच ते एकही सामना न जिंकताही ते उपांत्य फेरीत जाऊ शकतात, पण त्यांना आशा करावी लागेल की न्यूझीलंड आणि पाकिस्तान उर्वरित सामने पराभूत व्हावे. तसेच त्यांचा नेट रनरेटही कमी व्हावा. त्याचबरोबर श्रीलंका आणि नेदरलँड्सनेही 8 गुणांपर्यंत पोहचू नये.

श्रीलंका आणि नेदरलँड्स

श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडे असले, तरी खूप कमी संधी आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत त्यांचे प्रत्येकी ७ सामने खेळले असून २ विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे ४ गुण आहेत.

त्याचमुळे त्यांना या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर त्यांना त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, त्याचबरोबर न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांनी त्यांचे सामने पराभूत व्हावेत अशी आशा करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT