Virender Sehwag | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

धोनी World Cup 2011 दरम्यान का खायचा खिचडी? सेहवागने उघडले 'कॅप्टनकूल'चे सिक्रेट

सेहवागने खुलासा केला आहे की धोनी 2011 वर्ल्डकपवेळी फक्त खिचडी खायचा.

Pranali Kodre

Virender Sehwag reveals MS Dhoni eat khichdi during Cricket World Cup 2011:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर केले आहे. याबद्दल मुंबईमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि श्रीलंकेचा दिग्गज गोलंदजा मुथय्या मुरलीधरन उपस्थितीत होते. यावेळी सेहवागने एमएस धोनीबद्दल एक आठवण सांगितली आहे.

मुंबईत झालेल्या वर्ल्डकप 2011 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले होते. या अंतिम सामन्याचा सेहवाग आणि मुरलीधरन भाग होते. या वर्ल्डकपचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत झाले होते.

या वर्ल्डकपदरम्यान धोनीने फक्त खिचडी खाल्ली असल्याचा खुलासा सेहवागने केला आहे. सेहवागने स्टार स्पोर्ट्सला सांगितले 'प्रत्येकाची काहीतरी श्रद्धा असते आणि प्रत्येकजण ती श्रद्धा पाळत असतात. अशीच एमएस धोनीचीही होती, त्याने संपूर्ण वर्ल्डकप दरम्यान खिचडी खाल्ली होती.'

'तो म्हणायचा, जरी मी धावा करत नसलो तरी, ही श्रद्धा काम करत आहे आणि आपण सामने जिंकत आहोत.'

धोनी 2011 वर्ल्डकपमध्ये वैयक्तिकरित्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्याने अंतिम सामन्यापूर्वी या वर्ल्डकपमध्ये 8 सामन्यात साधारण 150 धावाच केल्या होत्या. पण अंतिम सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती घेत फलंदाजीला आल्यानंतर त्याने शानदार खेळी केली. त्याने 91 धावांची खेळी केली.

तसेच 97 धावा करणाऱ्या गौतम गंभीरबरोबर महत्त्वपूर्ण 109 धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताला विजय मिळवता आला होता. दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये सेहवागचाही फॉर्म चांगला होता. त्याने एका शतकासह 380 धावा केल्या होत्या.

वर्ल्डकप 2023 वेळापत्रक घोषित

मंगळवारी वर्ल्डकप 2023 स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

एकूण 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत. यातील 9 शहरांमध्ये भारताचे 9 साखळी सामने होणार आहेत.

बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होणार आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT