Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak

World Cup 2023: "12 वर्षांपूर्वी इथेच...", वेळापत्रक जाहीर होताच 'कॅप्टन' रोहितची पहिली प्रतिक्रिया

Rohit Sharma: भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

Rohit Sharma react after ICC Men's Cricket World Cup 2023 Schedule Announced: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (27 जून) वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वनडे वर्ल्डकपच्या या 13 व्या पर्वाला भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सोशल मीडिया अकाउंटवर रोहित शर्माच्या प्रतिक्रिया शेअर करण्यात आली आहे. रोहितने म्हटले आहे की 12 वर्षांनंतर भारतात वर्ल्डकप खेळणे शानदार अनुभव असेल.

यापूर्वी 2011 मध्ये भारतात वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरले होते.

Rohit Sharma
World Cup Qualifiers 2023: सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग अन् बॉलिंगमध्येही नेदरलँड्सच्या वॅन बिकचाच जलवा! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

रोहितची प्रतिक्रिया

दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेबद्दल रोहित म्हणाला, 'वर्ल्डकप स्पर्धा घरच्या मैदानांवर खेळणे हा शानदार अनुभव असेल. भारताने 12 वर्षांपूर्वी इथेच विजेतेपद मिळवले होते आणि मला माहित आहे की देशभरातील चाहते आम्हाला पुन्हा मैदानावर पाहाण्यासाठी उत्सुक असतील.'

'यावेळीची वर्ल्डकप स्पर्धा खूप स्पर्धात्मक असेल, कारण आता पूर्वीपेक्षा खेळ अधिक जलद झाला असून संघ अधिक सकारात्ककतेने खेळत आहेत. जगभरातील चाहत्यांसाठी हा शुभ संकेत असून, ही स्पर्धा त्यांना अनेक रोमांचक क्षणांचे वचन देते. आम्ही चांगली तयारी करण्यासाठी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आमचे सर्वोत्तम देण्यासाठी उत्सुक आहोत.'

Rohit Sharma
World Cup 2023 India: वेळापत्रक घोषित! 'या' दिवशी होणार श्रीगणेशा, 46 दिवस रंगणार थरार

वेळापत्रक घोषित

दरम्यान 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

एकूण 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत. यातील 9 शहरांमध्ये भारताचे 9 साखळी सामने होणार आहेत.

बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादमध्ये 15 ऑक्टोबरला होणार आहे.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. 

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com