Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गोव्यात लागू होणार ‘त्रिसूत्री भाषा’ पद्धत; ‘नापास नाही’ पद्धत राहणार कायम

Goa Education News: राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली तरी २०३० पर्यंत गोव्यात त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे.
Goa Education News
Goa Education NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू होऊन पाच वर्षे पूर्ण झाली तरी २०३० पर्यंत गोव्यात त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. सध्या उच्च शिक्षण, नववी-दहावी तसेच पूर्व-प्राथमिक गटातील नर्सरी, केजी-१, केजी-२ आणि तिसरी व सहावी इयत्तांमध्ये एनईपीची अंशतः अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंत हे धोरण लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाच्या मनात काही प्रमाणात गोंधळ असल्याने शिक्षण खात्याने विविध बैठका व कृतिसत्रांद्वारे मार्गदर्शन सुरू केले आहे. पूर्व-प्राथमिक ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची जबाबदारी एससीईआरटीकडे तर नववी ते बारावीपर्यंतची जबाबदारी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे असणार आहे.

एनईपीनुसार फाऊंडेशन गटात बालवाडी ते दुसरीपर्यंत कृतिआधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे. तिसरी ते पाचवीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, ‘वर्ल्ड अराऊंड अस’, कला व शारीरिक शिक्षण हे विषय असतील. सहावी ते आठवीसाठी त्रिसूत्री भाषा पद्धत लागू होणार असून हिंदी, समाजशास्त्र, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असेल.

नववी-दहावीमध्ये तीन भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, कला व ‘इंट्रा डिसिप्लिनरी एरिया’ असे दहा विषय असतील. सध्या ‘नापास नाही’ ही पद्धत कायम असून बोर्ड परीक्षांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, शिक्षण खाते, गोवा बोर्ड व एससीईआरटी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

इयत्ता नववी, दहावीतील विषय

तीन भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, कला, इंट्रा डिसिप्लिनरी एरिया.

Goa Education News
Goa Education: नव्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा अभ्‍यासक्रम बदलणार, पहिली ते दहावी या सर्वच इयत्तांसाठी 'NEP'ची अंमलबजावणी

नव्‍या शैक्षणिक धोरणाची रचना

फाऊंडेशन गट : बालवाडी ते दुसरी

प्रिपरेटरी गट : तिसरी ते पाचवी

मिडल गट : सहावी ते आठवी

सेकंडरी गट : नववी ते बारावी

Goa Education News
Education: मराठी माध्यम, पालकांत असलेले समज आणि गैरसमज

परीक्षापद्धतीतील बदल असा

दोन सत्र परीक्षा, मध्यसत्र परीक्षा रद्द, ॲक्टिव्हिटी व प्रकल्पांना महत्त्व, दहावी-बारावी बोर्ड परीक्षा कायम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com