ICC Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Head to Head Record :
भारतात क्रिकेट वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. वनडे वर्ल्डकपचे हे एकूण 13 वे पर्व आहे.
या स्पर्धेत बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर, शनिवारी जगातील सर्वात मोठे स्टेडियमवर असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.
भारत आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत १३४ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ५६ सामने भारताने जिंकले आहेत, तर ७३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
दरम्यान अहमादाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने एकच वनडे सामना खेळला आहे. 12 एप्रिल 2005 रोजी झालेल्या या सामन्यात भारताला 3 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. पण त्यानंतर या स्टेडियमचे पूर्ण नुतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नुतनीकरण केलेल्या स्टेडियमवर मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.
वनडे वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान संघात होणारा हा एकूण आठवा सामना असणार आहे. याआधी झालेल्या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत यापूर्वी 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आले होते.
दरम्यान, भारताने खरंतर वनडे आणि टी20 अशा दोन्ही प्रकारातील वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर 2021 पर्यंत वर्चस्व ठेवले होते. पण 2021 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने पराभवाचा साखळी तोडली आणि भारताविरुद्ध विजय मिळवला होता. पण पुन्हा 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये भारताने विजय मिळवला.
भारत आणि पाकिस्तान वनडे वर्ल्डकपमध्ये अखेरच्या वेळी 2019 साली इंग्लंडला झालेल्या स्पर्धेत आमने-सामने आले होते. ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या या सामन्यात भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावांची खेळी केली होती.
पण नंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकात 302 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाच पाठलाग करताना पाकिस्तानला 40 षटकात 6 बाद 212 धावा करता आल्या होत्या, त्यामुळे भारताने 89 धावांनी विजय मिळवला होता. विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.