बर्मिंगहम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ (Commonwealth Games 2022 ) स्पर्धेचा आजच्या शेवटच्या दिवशी देखील भारताचा बोलबाला पहायला मिळाला. 61 पदकांसह भारत पदक तालिकेत (CWG 2022 Medal list) चौथ्या स्थानी राहिला आहे. एकूण स्पर्धेत भारताने 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकं जिंकली आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने (Australia) सर्वाधिक 178 पदकं जिंकली आहेत, यात 67 सुवर्णपदकं आहेत. तसेच, 173 पदकांसह इंग्लंड (England) दुसऱ्या आणि 92 पदकांसह कॅनडा (Canada) तिसऱ्या स्थानावर आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेत काही नव्या चेहऱ्यांसह दिग्गज खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. भारताने दमदार कामगिरी करत चौथं स्थान मिळवलं. अखेरच्या दिवशी (CWG 2022 last day) पी.व्ही सिंधू, लक्ष्य सेन, अचंता शरथ आणि सात्विक साईराज/ चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पुरूष हॉकी संघ ऑस्ट्रेलियाकडून पराजित झाल्यानं त्यांना रौप्य पदक मिळालं.
कोणत्या खेळात किती पदकं?
भारताने यंदा मिळवलेल्या पदकांचा विचार करता कुस्तीनंतर सर्वाधिक पदकं ही वेटलिफ्टिंग खेळात मिळवली. भारताने 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 4 कांस्यपदकांसह एकूण 10 पदकं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवली. अॅथलेटिक्समध्ये भारताने 8 पदकं जिंकली. यामध्ये एका सुवर्णपदकासह 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश होता. बॉक्सिंग स्पर्धेतही भारताने दमदार कामगिरी करत सात पदकांना गवसणी घातली. महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला रौप्य मिळालं. बॅडमिंटनस्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह दोन कांस्य आणि एक रौप्यपदक जिंकत 6 पदकं मिळवली. टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिसमध्ये मिळून भारताने तब्बल 4 सुवर्णपदकं, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली.
दरम्यान, भारताने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (India at commonwealth games 2022) 2010 साली 101 पदकं जिंकून दुसरे स्थान पटकावले होते. तसेच, 2002 साली 64 आणि 2018 साली 66 पदकं कमावली होती. 1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.