वास्को: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुरगाव मामलेदार कार्यालयातर्फे जोरदार तयारी चालली आहे. मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्राची पाहणी केली. व तेथे योग्य 'सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. (Goa panchayat election 2022: Mormugao candidates run for campaign )
मतदानाची तारीख जवळ येत असल्याने उमेदवारांचीही प्रचारासाठी धावपळ उडाली आहे. काही जणांनी आपले प्रचार फलक लावले होते. परंतु त्यासंबंधी तक्रारी आल्याने मुरगाव मामलेदार कार्यालयातून त्वरित दखल घेऊन ते फलक जप्त करण्यात आले. वीज खांबावर लावण्यात आलेले प्रचार फलकही वीज खात्यांच्या 'कामगारांमार्फत काढण्यात येऊन जप्त करण्यात आले.
प्रचार फलकांसंबंधी तक्रारी आल्यास मुरगाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धावपळ करीत त्याठिकाणी जावे लागत आहे. मुरगावचे मामलेदार व निवडणूक निर्वाचन अधिकारी रणजित साळगावकर व सहाय्यक निर्वाचन अधिकारी कुंदन गडेकर हे मुरगाव तालुक्यातील पंचायत भागात धावती भेट देली. व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
मुरगाव तालुक्यातील सात पंचायतीतील बहुतेक प्रभागांत एक हजारांपेक्षा कमी मतदार असल्याने तेथे फक्त एकच मतदान केंद्र असेल. तथापी सांकवाळ पंचायतीतील प्रभाग क्रमांक एकची मतदार संख्या 3,275 असल्याने तेथे तीन मतदान केंद्रे, प्रभाग सहाची मतदार संख्या 1296 आहे. तसेच दोन मतदान केंद्रे, तसेच प्रभाग सातची मतदार संख्या 1803 आहे.
चिखली पंचायतीच्या अकरा प्रभागांमध्ये 9195 मतदार असून त्यापैकी महिला 4662 तर पुरुष 4533 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक एक व दोनसाठी चिखलीच्या सरकारी प्राथमिक विद्यालयामध्ये, प्रभाग क्रमांक तीन व चारसाठी दाबोळीच्या सरकारी मीडल स्कूलमध्ये आहे. तर प्रभाग क्रमांक पाच व सहासाठी केशव स्मृती स्कूलमध्ये, प्रभाग सात, आठ, नऊसाठी रेजिना मुंडी हायस्कूलमध्ये, प्रभाग दहा व अकरासाठी ग्रामपंचायत कार्यालय चिखलीमध्ये मतदान केंद्रे असतील.
यात प्रभाग तीन मध्ये मतदार संख्या 1384 असून या मतदारसंघात दोन मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रभाग आठ मध्ये 1288 मतदार असल्याने या प्रभागातील दोन मतदार केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. बाकी सर्व प्रभागात एक हजाराहून कमी मतदारसंघ असल्याने तिथे एक एक मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
चिखली बोगमाळो पंचायतीच्या सात प्रभागांमध्ये 1,769 मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार 830 तर महिला मतदार 939 आहेत. येथील प्रभाग एक, दोन,
तीन साठी बोगमाळोच्या सरकारी प्राथमिक विद्यालयात, प्रभाग चार, पाचसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सहासाठी गोवा सर्व शिक्षा अभियान पोडशिरो केंद्र, प्रभाग सातसाठी पोडशिरोच्या सरकार प्राथमिक विद्यालयामध्ये मतदान केंद्रे असतील. कुठ्ठाळी पंचायतीच्या अकरा प्रभागांमध्ये 5,212 मतदार असून त्यापैकी 2,380 पुरुष तर 2,832 महिला आहेत.
वेळसांव, पाले,आसोसीर पंचायतीत 3,180 मतदार आहे. त्यापैकी 1556 पुरुष तर 1624 महिला मतदार आहेत. प्रभागएक व तीनसाठी वेळसांवचे स्पोर्ट कॉम्पेक्समध्ये, प्रभाग क्रमांक दोन व चार, पाचसाठी वेळसांवच्या इन्फंट जेसूस अकाडमी हायस्कूलमध्ये तर प्रभाग सात साठी कस्टम आउटपोस्ट, खोल आसोसीमध्ये मतदान केंद्रे असतील.
कासावली पंचायतीमध्ये 4,726 मतदार असून त्यापैकी 2,178 पुरुष तर 2,548 महिला मतदार आहेत. येथील प्रभाग एक व नऊसाठी बोरसुलेच्या सरकारी प्राथमिक विद्यालयमध्ये, प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, सात,आठसाठी कासावलीच्या सेंट थॉमस हायस्कूलमध्ये, प्रभाग पाच, सहासाठी कासावली सरकारी प्राथमिक विद्यालयमध्ये मतदान केंद्रे असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.