Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: भारताने लगावला विजयाचा 'षटकार', गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव

IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे, तर गतविजेत्या इंग्लंडचा हा पाचवा पराभव आहे.

रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 34.5 षटकांत 129 धावांवर गडगडला.

इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 27 धावा केल्या. बेन स्टोक्स आणि जो रुट यांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या.

इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले. विश्वचषक 2023 मध्ये भारताने प्रथमच पहिल्या डावात फलंदाजी केली.

दरम्यान, 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्येच संघाने 4 गडी गमावले. इंग्लंडने 10 षटकांत 4 गडी गमावून 40 धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात डेव्हिड मलान (16) आणि जो रुट (0) यांना सलग चेंडूवर बाद केले. यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टो (14) यांनाही लागोपाठच्या चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या मॅजिक बॉलने कर्णधार जोस बटलरला (10) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने दुसऱ्या स्पेलमध्ये मोईन अलीला (15) बाद केले. जडेजाने ख्रिस वोक्सला (10) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

यानंतर कुलदीपने लियाम लिव्हिंगस्टोनला (27) बाद करुन भारताचा विजय जवळपास निश्चित केला. शमीने आदिल रशीदला बाद करुन चौथी विकेट घेतली. शेवटी जसप्रीत बुमराहने मार्क वुडला बाद करुन इंग्लंडचा डाव संपवला.

तत्पूर्वी, रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या. इंग्लंडकडून (England) डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले.

विश्वचषक 2023 मध्ये भारताने प्रथमच पहिल्या डावात फलंदाजी केली. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट्स संघाने 12 षटकांतच गमावल्या होत्या.

दुसरीकडे, पहिल्या पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून भारताने केवळ 35 धावा केल्या होत्या. यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. केएल राहुल 58 चेंडूत 39 धावा करुन बाद झाला.

रोहित शर्माने चांगली खेळी केली पण स्पर्धेतील आपले दुसरे शतक त्याला झळकावता आले नाही. रोहितने 101 चेंडूत 87 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा जास्त वेळ क्रीजवर टीकू शकला नाही आणि केवळ 8 धावा करुन बाद झाला.

मोहम्मद शमीने 5 चेंडूत एक धाव काढली. सूर्यकुमार यादव 47 चेंडूत 49 धावा करुन बाद झाला. शेवटी कुलदीप आणि बुमराह यांच्यात 21 धावांची भागीदारी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT